कै.रघुनाथराव केंद्रे इन्स्टिट्यूट आफ नर्सिंग, (जी एन एम ) परळी येथील नर्सिंग चे शिक्षण पूर्ण केलेला विद्यार्थी दशरथ सटवाराव घुले याचा महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक
कै.रघुनाथराव केंद्रे इन्स्टिट्यूट आफ नर्सिंग, (जी एन एम ) परळी येथील नर्सिंग चे शिक्षण पूर्ण केलेला विद्यार्थी दशरथ सटवाराव घुले याचा महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक
परळी/ प्रतिनिधी
सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासनामार्फत 28 फेब्रुवारी 2021 ला परिचारिका ( staff nurse) या पदासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्र राज्यातील सुमारे 25000 विद्यार्थ्यांमधून अजित प्रतिष्ठान संचलित कै.रघुनाथराव केंद्रे इन्स्टिट्यूट आफ नर्सिंग, (जी एन एम) परळी वैजनाथ, बीड येथील नर्सिंग चे शिक्षण पूर्ण केलेला विद्यार्थी दशरथ सटवाराव घुले याने 200 पैकी 172 मार्क मिळवून महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला असून सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी घडतो तो शिक्षक म्हणजे गुरू पासून तसेच या इन्स्टिट्यूट मध्ये विद्यार्थी घडविण्यासाठी डॉ अजित केंद्रे सेक्रेटरी आणि डॉ अंजली अजित केंद्रे प्रेसिडेंट आणि प्रिन्सिपल वाघमारे सर व नागेंद्र सर यांनी खूप परिश्रम घेत नाव लौकिक केलेल्या घुले परिवारास व आपल्या विध्यार्थ्यांस अभिनंदन केले.