फुले-शाहू-आंबेडकरी आंदोलनाच्या उद्देशपूर्तीसाठी जाती व्यवस्था निर्मुलन करा-भगवान साकसमुद्रे
फुले-शाहू-आंबेडकरी आंदोलनाच्या उद्देशपूर्तीसाठी जाती व्यवस्था निर्मुलन करा-भगवान साकसमुद्रे
परळी वैजनाथ दि.१४ (प्रतिनिधी)
फुले-शाहु- आंबेडकरी आंदोलनाच्या उद्देशपूर्तीसाठी जाती व्यवस्था निर्मुलन करणे आवश्यक आहे. ज्यांना जाती अंताची लढाई लढायची त्यांनी जाती व्यवस्था समजून घेणे आवश्यक आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील आदर्श समाज,समता,स्वातंत्र्य आणि मित्रत्व या मुल्यांवर आधारित समाज बाबासाहेबांना अपेक्षित आहे असे प्रतिपादन फुले, आंबेडकरी अभ्यासक भगवान साकसमुद्रे यांनी केले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन शहरातील साठेनगर, भिमनगर येथे करण्यात आले होते. साठेनगर येथील कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण भगवान साकसमुद्रे व भिमनगर येथील ध्वजारोहण प्रा.विलास रोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना भगवान साकसमुद्रे म्हणाले की, देशातील जातींची कार्यपध्दती, उत्पती आणि विकास समजल्याशिवाय जाती व्यवस्थेचे उच्चाटन करणे शक्य नाही. यावेळी विचारमंचावर नगरसेवक नितीन रोडे, प्रा.डॉ विनोद जगतकर, भारत ताटे, स्वप्निल साळवे, शिवाजी बनसोडे, बी.एस गायकवाड, जितेंद्र मस्के, दत्ता कांबळे आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन, आभार बालाजी गायकवाड यांनी केले.