डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव दिलिपराव भरड यांची महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेश व परीनियम तपासणी समितीवर निवड; परळीत ह्रद्य सत्कार
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव दिलिपराव भरड यांची महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेश व परीनियम तपासणी समितीवर निवड; परळीत ह्रद्य सत्कार
परळी वैजनाथ,प्रतिनिधी….
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव दिलिपराव भरड यांची महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेश व परीनियमांची तपासणी समितीवर नुकतीच निवड झाली आहे.या निवडीबद्दल त्यांचा परळीत सत्कार करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव श्री.दिलिपराव भरड यांची महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेश व परीनियमांची तपासणी समितीवर सदस्य म्हणून निवड झाली. श्री.भरड हे परळी मध्ये एका लग्न समारंभास आलेड असताना त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी परळीचे माजी नगराध्यक्ष, नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, कै. ल.दे.देशमुख महिला महाविद्यालयाचे अध्यक्ष संजय देशमुख,ज्येष्ठ नेते प्रकाश जोशी,श्रीकांत मांडे,अजय जोशी, जितेंद्र नव्हाडे,चारुदत्त करमाळकर,शैलेन्द्र आर्विकर आदि उपस्थित होते.