धनुभाऊंचा सेवाधर्मउपक्रम कठिण काळात ठरतोय ‘संजीवनी’ !
धनुभाऊंचा सेवाधर्मउपक्रम कठिण काळात ठरतोय ‘संजीवनी’ !
⬛ महिला व लहान मुलांमुलीं करिता मोफत 100 बेडचे विलगीकरण केंद्र बनले ‘आधारगृह’
परळी वैजनाथ, प्रतिनिधी…….
कोरोना महामारी ने संपुर्ण जगला विळखा घातला असताना अनेक व्यक्ती, संस्था पुढे येऊन मदत करत आहेत.कोरोनाचा वाढता कहर पाहता करोनाग्रस्त जनतेसाठी मदत म्हणून विविध क्षेत्रातील लोक काम करत आहेत. ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी व तालुक्यात सेवाकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सर्वस्तरातील सर्वतोपरी ‘सेवाकार्य’ परळीतील कोरोना बाधितांसाठी ‘संजीवनी’ ठरत आहे.धनुभाऊंचा सेवाधर्म उपक्रम या कठिण काळात खरोखरच लोकोपयोगी व लाभदायक ठरत आहे.महिला व लहान मुलांमुलींकरिता मोफत 100 बेडचे विलगीकरण केंद्र खुप मोठे ‘आधारगृह’ ठरले आहे.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या कोविड काळातील मदतीचा सेवाधर्म…सारं काही समष्टिसाठि या लोकोपयोगी अभिनव उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संचलित शासनमान्य 100 बेडच्या महिला व लहानमुलांच्या मोफत आइसोलेशन सेंटर मध्ये रुग्णांना सेवा दिली जात आहे. महिला व लहान मुलां मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था व स्वतंत्र वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्याने हा खुप मोठा दिलासा नागरिकांना मिळाला आहे. या ठिकाणी नियमितपणे प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.गुरुप्रसाद देशपांडे व राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे शहराध्यक्ष डॉ.आनंद टिंबे व नर्सिंग स्टाफ वैद्यकीय तपासणी व सेवा बजावत आहेत.सुसज्ज व्यवस्था,स्वतंत्र रुम्स, वेळच्या वेळेवर पौष्टिक नाष्टा व दोन वेळचे जेवण,औषधोपचार, करमणूकीकरिता टी व्ही संच व केबल कनेक्शन,गरम पाणी,24 तास सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही सर्व्हिलन्स,डॉक्टर्स ऑन कॉल,प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ,2 शिफ्ट मध्ये स्वच्छता,आनंदी वातावरण, प्राणायाम यासह अनेक सुविधा या “आयसोलेशन सेंटरमध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शहरसरचिटणीस अनंत इंगळे व पदाधिकारी स्वतः या ठिकाणी व्यवस्था पाहत आहेत.
ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी व तालुक्यात सेवाकार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सर्वस्तरातील सर्वतोपरी ‘सेवाकार्य’ परळीतील कोरोना बाधितांसाठी ‘संजीवनी’ ठरत आहे. सेवाधर्म उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या सेवाकार्य उपलब्धतेने कोरोनाबाधित रुग्ण व नागरीकांना खूप मोठा आधार मिळाला आहे. दरम्यान महिला व लहान मुलांमुलींकरिता मोफत 100 बेडचे विलगीकरण केंद्राचा गरजुंनी लाभ घ्यावा. व कोरोनामुक्त होवून निरोगी व्हावे. अधिक माहितीसाठी
बाजीराव धर्माधिकारी 9422201111 अनंत इंगळे 9822576003 यांच्या शी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.