सेवाधर्म : फ्रंट लाईन फिल्डवर्कर पत्रकार बांधवांना कोरोना सुरक्षा किट वितरण शुभारंभ

Spread the love

सेवाधर्म : फ्रंट लाईन फिल्डवर्कर पत्रकार बांधवांना कोरोना सुरक्षा किट वितरण शुभारंभ
परळी वैजनाथ, प्रतिनिधी…
ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या सेवाधर्म :सारे काही समष्टीसाठी उपक्रमांतर्गत फ्रंट लाईन फिल्डवर्कर असलेल्या पत्रकार बांधवांना कोरोना सुरक्षा किट वितरण शुभारंभ करण्यात आला.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या सहकार्याने व गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सेवाधर्म या उपक्रमात कोरोना फ्रंट लाईन लीडर यांना कोरोना सुरक्षा किटचे सुनियोजित पद्धतीने वितरण चालू असून आज पत्रकार बंधू भगिनींना सुरक्षा किट वितरणाची सुरुवात संपादक मंडळ यांच्यापासून करण्यात आली. यावेळी दै.मराठवाडा साथी चे कार्यकारी संपादक प्रशांत जोशी,दै.जगमित्रचे संपादक बाळासाहेब कडभाने, दै.दिव्यअग्नी चे संपादक प्रकाश सुर्यकर, दै.वैद्यनाथ वार्ताचे संपादक रामप्रसाद गरड, दै.परळी प्रहारचे राजेश साबणे,दै. महाराष्ट्र प्रतिमा चे ज्ञानोबा सुरवसे, दै.न्याय टाइम्सचे बालकिशन सोनी,दै.जनशक्तीचे सेवकराम जाधव, तसेच झुंजार नेता चे वार्ताहर अनंत उर्फ पप्पू कुलकर्णी,पत्रकार प्रल्हाद कंडुकटले यांना कोरोना सुरक्षा किट वितरित करण्यात आले. परळीतील सर्व पत्रकार बंधुंना कोरोना सुरक्षा किट वितरीत करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शहर सरचिटणीस अनंत इंगळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page