कोरोना होऊन गेलेल्या म्युकरमायकोसीसची लक्षणे असणाऱ्या रूग्णांची मोफत तपासणी डॉ. संतोष मुंडे
कोरोना होऊन गेलेल्या म्युकरमायकोसीसची लक्षणे असणाऱ्या रूग्णांची मोफत तपासणी डॉ. संतोष मुंडे
म्युकरमायकोसीसचे लक्षणे असणाऱ्या रूग्णांना श्रीनाथ हाँस्पीटल येथे 10 ते 1 वाजेपर्यंत मोफत तपासणीसाठी संपर्क साधावा
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राज्यासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांना म्युकरमायकोसीस या बुरशीजन्य आजाराची लागण झाली आहे. म्युकरमायकोसीस आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. कोरोना पाठोपाठ हे नवीन आव्हान उभे टाकले आहे. हा आजार अंगावर न काढता वेळेत उपचार घेतल्यास रूग्ण बरा होतो. म्युकरमायकोसीस बाधित रुग्णांवर श्री नाथ हाँस्पीटल येथे मोफत तपासणी करण्यात येईल म्युकरमायकोसीसचे लक्षणे असणाऱ्या रूग्णांनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष, कान, नाक, घसा तज्ञ डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.
एकीकडे देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे म्युकरमायकोसिसच्या रुपाने नवीन संकट देशासमोर उभे राहिले आहे. कोरोनासोबतच म्युकरमायकोसिसच्या रुग्णात झपाट्याने वाढ होऊ लागल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. म्युकरमायकोसिस हा चेहरा, संक्रमित नाक, डोळे आणि मेंदूला बाधित करू शकतो. त्यामुळे दृष्टी जाण्याचीही भीती असते. त्याबरोबरच म्युकरमायकोसिसचा संसर्ग हा फुप्फुसांपर्यंतही पोहोचू शकतो, डायबिटिस, कोरोना पॉझिटिव्ह आणि स्टेरॉईड घेणाऱ्या रुग्णांमध्ये या बुरशीजन्य संसर्गाची शक्यता अधिक असते.”कोविड -19 पूर्वी संसर्ग होण्याची फारच कमी प्रकरणे आढळली. मात्र आता मोठ्या संख्येने हि प्रकरणे जास्त प्रमाणात नोंदवली जात आहे. अशी आहेत लक्षणे डोळे किंवा नाक दुखणे, तसेच नाक किंवा डोळ्यांच्या भोवती लालसरपणा येणे. ताप येणे. तीव्र डोकेदुखी. कफ होणे. श्वास घ्यायला त्रास होणे. रक्ताच्या उलट्या होणे. मानसिक स्वास्थ्य बिघडणे.कोणाला होऊ शकतो?ज्यांचा डायबेटिस हा प्रमाणाच्या बाहेर आहे.सतत औषधांच्या सेवनामुळे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. दीर्घकाळ आयसीयू वर उपचार घेत असणारे रुग्ण. कॅन्सरसारख्या सहव्याधी असणारे रुग्ण. कशी घ्याल काळजी? धुळीच्या ठिकाणी जाताना तोंडावर मास्क लावा. बागकाम करताना पायात बूट, लाँग पँट, हातात ग्वोव्हज् घाला. त्वचेची अॅलर्जी होऊ नये म्हणून साबण लावून स्वच्छ हात-पाय धूत रहा. कसा ओळखाल आजार? कोविड रुग्ण आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींनी हा आजार कसा ओळखावा याची लक्षणे- नाक चोंदणे, सतत नाक गळणे, गालाचे हाड दुखणे. चेह-याच्या एका बाजूला तीव्र वेदना होणे किंवा सूज येणे. नाकाजवळील भाग किंवा टाळूवर काळसर डाग पडणे. दात दुखणे, दात पडणे, जबडा दुखणे. अंधुक दिसणे, डोळे दुखणे, ताप येणे त्वचेच्या विकृती होणे. छातीत दुखणे, त्वचेतून रक्तस्त्राव होणे, श्वसन क्रिया बिघडणे काय करावे? हायपरग्लायसेमिया नियंत्रित ठेवणे. कोरोनातून बरे झाल्यानंतर शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण मोजणे. डायबेटिस असणा-या व्यक्तींनी शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण मोजणे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधांचे योग्य डोस योग्य वेळी घेणे. अँटीबायोटिक्स आणि अँटीफंगल औषधांचे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सेवन करणे .काय करू नये? सांगितलेल्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. सातत्याने नाक चोंदत असल्यास त्याकडे जास्त दुर्लक्ष करू नये. विशेषतः कोविडबाधित आणि इतर आजार असलेल्या व्यक्तींनी. त्वचेवरील अॅलर्जीकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपचार करा. म्युकरमायकोसीसच्या आजारावरील उपचारांसाठी वेळ दवडू नका. आजार होऊ नये म्हणून काय कराल ? डायबेटिस नियंत्रणात ठेवा. व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करा. जास्त आवश्यकता नसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधांचे डोस कमी करा. डॉक्टरांच्या सल्ल्यांचे काटेकोरपणे पालन करा. तसेच तालुक्यातील म्युकरमायकोसीसच्या आजाराचे लक्षणे असलेल्या रूग्णांनी आजार अंगावर न काढता तपासणी करून घ्यावी तसेच लवकर तपासणी केल्यास आजार बरा होऊ शकतो. तसेच श्रीनाथ हाँस्पीटल येथे 10 ते 1 वाजेपर्यंत संपर्क करावा तसेच म्युकरमायकोसीसच्या तपासणी करून घ्यावी असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा धनंजय मुंडे आरोग्य मित्र योजनेचे प्रदेशाध्यक्ष , कान, नाक, घसा तज्ञ डॉ. संतोष मुंडे यांनी केले आहे.