ऑक्सिजन पातळी ४० वर असताना डॉक्टरांच्या प्रयत्नाने रूग्ण मृत्यूच्या दाढेतून बाहेर
ऑक्सिजन पातळी ४० वर असताना डॉक्टरांच्या प्रयत्नाने रूग्ण मृत्यूच्या दाढेतून बाहेर
परळी ( प्रतिनिधि) :-
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय रूग्णालयाच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या प्रमाण वाचविण्यासाठी डॉक्टरांची टीम अतिशय परिश्रम घेत असल्याचे अनेक उदाहरण समोर येत आहे
आज आश्चर्यचकित करणारे उदाहरण समोर आले आहे
कोरोना वर उपचार चालू असताना मेघराज चौधरी यांच्या ऑक्सिजन लेवल ४० वर गेला होता मात्र या परिस्थितित प्रयत्नांची पराकाष्ठा करून स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय टीमने त्यांच्या ऑक्सिजन लेवल ९६ आणून त्यांना नवे जीवनदान मिळून आज त्यांच्या सुखरूप घरी सोडले आहे
या डॉक्टरांची टीम वर मेडिसिन विभाग प्रमुख डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली मेघराज यांच्यावर डॉक्टर सचिन चौधरी, डॉक्टर अनिल मस्के, डॉक्टर विश्वजीत पवार व परळी चे सुपुत्र डॉक्टर मुस्तकीम शेख यांनी उपचार सुरू केला होता
परळीचे सुपुत्र डॉक्टर मुस्तकीम यांची कामगिरी बद्दल परळीत त्यांच्या नाव खूपच चर्चेत आलेला आहे या कामगिरीबद्दल परळीचे खान रसुल अफसर यांनी डॉक्टर मुस्तकीम बद्दल शुभेच्छा व्यक्त केली आणि भविष्यात गरीब लोकांसाठी काम करा असी इच्छा व्यक्त केली