सेवाधर्म उपक्रमांतर्गत आता हॅलो डॉक्टर टेलीमेडिसिन हेल्पलाईन सेवा ;ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आज आॅनलाईन उद्घाटन
सेवाधर्म उपक्रमांतर्गत आता हॅलो डॉक्टर टेलीमेडिसिन हेल्पलाईन सेवा ;ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आज आॅनलाईन उद्घाटन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी…
ना.धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या सेवाधर्म :सारे काही समष्टीसाठी उपक्रमांतर्गत आता सर्वांना अतिशय उपयुक्त ठरणारी हॅलो डॉक्टर टेलीमेडिसिन हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात येत असुन ना.धनंजय मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या हस्ते आज( दि.१९) आॅनलाईन उद्घाटन होणार आहे.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून व गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सेवाधर्म या उपक्रमात विविध सेवाकार्य सुरू आहेत.यामध्ये नागरीक व रुग्णांची गरज लक्षात घेऊन सर्वांना अतिशय उपयुक्त ठरणारी हॅलो डॉक्टर टेलीमेडिसिन हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात येत आहे. आज-काल दैनंदिन जीवनामध्ये वातावरणातील बदल व अन्य कारणांमुळे शारिरीक व्याधी निर्माण होतात.सध्या कोविड १९ ने वातावरण व्यापुन टाकले आहे.या परिस्थितीत रुग्णांत मोठ्या प्रमाणावर भिती निर्माण झाली आहे.परंतु घाबरून जाऊन काही साध्य होणार नाही.यासाठी काळजी व योग्य निदान, उपचार आवश्यक आहे. मात्र सोशल डिस्टंसिंग व कोविडविषयक नियमांचे पालन करावे लागते अशा परिस्थितीत प्रत्यक्षात डॉक्टरांकडे जाणे,प्रत्यक्ष उपचार घेणे यासाठी बंधने आली आहेत.यामध्ये टेलीफोन कॉन्फरन्स द्वारा डॉक्टरांचा सल्ला व त्यांच्या निर्देशाप्रमाणे रुग्णांना उपचार करता येऊ शकतो. यासाठी हॅलो डॉक्टर टेलीमेडिसिन हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात येत आहे. या उपक्रमात डॉ.संतोष मुंडे आणि डॉ.आनंद टिंबे हे समन्वयक आहेत.परळीतील तज्ञ डॉक्टरांचे कन्सल्टिंग नागरिकांना प्राप्त होणार आहे.
हॅलो डॉक्टर टेलीमेडिसिन हेल्पलाईन सेवेचा शुभारंभ ना. धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल चे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या हस्ते आज दि.१९ रोजी सकाळी ११ वा. ऑनलाइन होणार आहे.या उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, शहर सरचिटणीस अनंत इंगळे आदी पदाधिकारी यांनी केले आहे.