सेवाधर्म :परळीतील दहा गरजू कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार विवाह सहाय्य निधी वितरित!
सेवाधर्म :परळीतील दहा गरजू कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार विवाह सहाय्य निधी वितरित!
परळी वैजनाथ, प्रतिनिधी…
सेवाधर्म: सारे काही समष्टीसाठी उपक्रमांतर्गत परळीतील गरजु कुटुंबातील विवाह कार्यासाठी प्रत्येकी दहा हजार विवाह सहाय्य निधी वितरित करण्यात आला. यामुळे कोरोनाच्या या कठिण काळात गरजू कुटुंबांना खुप मोठा मदतीचा हात मिळणार आहे.ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून होत असलेले सेवाकार्य खरोखरच लोकोपयोगी ठरत आहे.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या कोविड प्रादुर्भावतील लोकोपयोगी उपक्रम “सेवाधर्म” या मध्ये आज परळीतील सुरेश आढाव,आश्रोबा होके,माणिकराव पोटभरे,रणजित पुरभय्ये,दौलत सरदार खान पठाण,अजयराव दंडगुले सलीमखान रासद खान, खेत्रे,तरकसे, कांबळे या दहा गरजू कुटुंबातील विवाहांना प्रत्येकी 10000 रुपये निधी ना.धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यलयात वितरित करण्यात आला.यावेळी गटनेते वाल्मिकअण्णा कराड शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, जिल्हाउपाध्यक्ष सुरेशअण्णा टाक,बांधकाम सभापती शंकर आडेपवार,पाणीपुरवठा सभापती श्रीकृष्ण उर्फ भाउ कराड नगरसेवक विजय भोयटे,माजी नगरसेवक वैजनाथ बागवाले नगरसेवक अनिल आष्टेकर, सरचिटणीस अनंत इंगळे,शेख शम्मो,रवी मुळे,शेख मुख्तार, आदी मान्यवर उपस्थित होते.
⬛ असाही सेवाधर्म..!
कोविडच्या प्रादुर्भावात आपल्या जवळची अनेक सोन्यासारखी माणसे मरण पावली,काही व्यक्ती अश्या होत्या की त्या कुटुंबप्रमुख होत्याआणि त्यांचं हातावर पोट होत यापैकीच किशोर स्वामी जे की अतिशय बिकट परिस्थिती होती आणि आपल्या मागे दोन छोटी मुले ठेवून गेली संगोपनाची पूर्ण जबाबदारी आता त्यांच्या पत्नीवर आणि लहान भावांवर आलेली आहे.दुसरे कोरोना मयत व्यक्ती म्हणजे विरभद्र समशेट्टी जे की एका किराणा दुकानात कामाला होते त्यांना सुद्धा या विषाणूने गाठले आणि ते मरण पावले त्यांच्या सुद्धा लहान मुलांची जबाबदारी त्यांच्या पत्नीवर आलेली आहे.सेवाधर्म टीम ने ही गरज ओळखून दोन्ही परिवारांना तात्काळ सहाय्य म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत केली,नक्कीच ही मदत खूप कमी आहे पण कुटुंबाला एक तात्काळ उदरभरणाची सोय पुढील काही दिवस व्हावी म्हणून सदर मदत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या सहकार्यातुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व धनंजय मुंडे हेल्पलाईनच्या माध्यमातून करण्यात आली.