जागृती पतसंस्थेत स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
जागृती पतसंस्थेत स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)…
येथील जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या अरुणोदय मार्केटमधील मुख्य कार्यालयात स्वराज्य जननी, राष्ट्रमाता, राजमाता, स्वराज्यसंकल्पिका आऊ जिजाऊ व भारताचे महान समाज सुधारक, तत्त्वज्ञानी विचारवंत, स्वामी विवेकानंद यांची जयंती संयुक्तरित्या पारंपारिक पद्धतीने मान्यवरांच्या उपस्थित साजरी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की येथील अरुणोदय मार्केट स्थित जागृती नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयामध्ये आज दिनांक 12 जानेवारी रोजी स्वराज्य जननी राष्ट्रमाता राजमाता स्वराज्यसंकल्पिका आऊ जिजाऊ व थोर समाजसुधारक तथा तत्वज्ञानी विचारवंत स्वामी विवेकानंद यांची जयंती दोन्ही महान विभूतींच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून पारंपारिक पद्धतीने संयुक्तरीत्या साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागृती ग्रुपचे प्रमुख मार्गदर्शक तथा सहकाररत्न प्रा. गंगाधर शेळके सर हे तर प्रमुख अतिथी म्हणून संत तुकाराम गृहनिर्माण संस्थेचे उपाध्यक्ष वैजनाथराव सोळंके, जागृती चे सचिव वसंतराव सूर्यवंशी, अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे संजय सुरवसे, संत तुकाराम गृहनिर्माण संस्थेचे संचालक राजेश ठोंबरे, श्री काळे सर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना परळी भूषण प्रा. गंगाधर शेळके सर म्हणाले की स्वराज्याचे पहिले छत्रपती राजे शिवरायांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊंनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्ष साकार करण्यासाठी छत्रपतींना ज्ञान, चातुर्य, संघटन पराक्रम आदि सर्वंकष अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवरायांना दिले. तसेच शौर्य नीती आणि धैर्याची शिकवण संबंध विश्वाला दिली. यावेळी स्वामी विवेकानंदाच्या जीवन चरित्र वरती प्रकाश टाकताना संत तुकाराम गृहनिर्माण संस्थेचे उपाध्यक्ष वैजनाथराव सोळंके यांनी सांगितले की भारतातील महान समाजसुधारक स्वामी विवेकानंदांनी तरुणांना उठा जागे व्हा आणि जोपर्यंत लक्ष्य प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबु नका आदी बाबींची शिकवण देत आधुनिक भारताची ओळख संबंध जगाला करून दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिवश्री संजय सुरवसे यांनी केले.
यावेळी जागृती ग्रुपचे सर्वश्री प्रल्हाद सावंत हेमंत कुलकर्णी सुधाकर शिंदे दत्ता चव्हाण रमेश लोखंडे आदि कर्मचारीवृंद उपस्थित होते.