कोरोनाला घालवायचे असेल तर दुहेरी मास्क वापरा
कोरोनाला घालवायचे असेल तर दुहेरी मास्क वापरा
अरिहंत जैन सेवाभावी संस्थेच्या वतीने 2201 मास्कचे परळीत वितरण
परळी । प्रतिनिधी
परळी वैजनाथ येथे सर्व पोलिस ठाणे, नगर पालिका, महसूल, विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचारी, पत्रकार, वृत्तपत्र वितरक, निराधार महिला आणि विविध समुहातील नागरीकांना एन-९५ व सर्जिकल अशा दोन प्रकारच्या मास्कचे वितरण करण्यात आले. अरिहंत जैन सेवाभावी संस्थेच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, शहर पोलिस ठाण्यात या उपक्रमाचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
अरिहंत जैन सेवाभावी संस्थेच्या वतीने परळी शहरात मास्क वितरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मास्क वापरा व कोरोनाला हरवाचा संदेश या माध्यमातून देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले. परळी शहर पोलिस ठाण्यात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी नायब तहसिलदार बी.एल.रूपनर, परळी शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक खरात, संभाजी नगरचे सहा.पोलिस निरिक्षक नारायण गित्ते, सहा.पोलिस निरिक्षक पालवे, परळी ग्रामिण पोलिस ठाण्याचे सहा. पोलिस निरिक्षक शहाणे, नगर पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे, संपादक प्रकाश सुर्यकर,प्रकाश वर्मा,पत्रकार दत्तात्रय काळे, प्रल्हाद कंडूकटले, जगदीश शिंदे, प्रवीण फुटके,शेख बाबा,माधव शिंदे,माधव गित्ते,संभाजी मुंडे,यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. अरिहंत जैन सेवाभावी संस्थेच्या वतीने अध्यक्ष प्रितम बोरा, उपाध्यक्ष कुलभूषण जैन, सचिव धिरज बडेरा, सहसचिव जिग्नेश जैन, कोषाध्यक्ष आशिष गादीया, सदस्य डॉ.दिनेश लोढा, रूपेश ललवाणी, संतोष ललवाणी, महावीर कांकरिया, दीपक भंडारी, नितीन लोढा, हिमेश कांकरीया आदींनी उपस्थित सर्वांना दुहेरी म्हणजेच एक एन-९५ व सर्जिकल मास्कचे वितरण केले.