एकीकडे कोरोना काळ तर दुसरीकडे विद्युत पुरवठा बंद ने उष्णतेचा मार
एकीकडे कोरोना काळ तर दुसरीकडे विद्युत पुरवठा बंद ने उष्णतेचा मार
परळी/प्रतिनिधी
परळी शहरात गेल्या 15 दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे सतत दिवसा दुपारी रात्री कोणत्याही वेळी वीज पुरवठा खंडित करत असून शहरात कोरोना महामारीने लॉकडाऊन असल्याने जे ते आप आपल्या घरात बसून आहेत त्यातच गेल्या दोन आठवढ्या पासून परळी शहरात कोणत्याही वेळी विद्युत विभागाकडून बत्ती गुल होत आहे.या मुळे सर्व नागरिकांना एकीकडे कोरोना ने भय तर दुसरी कडे लाईट बंद ने उष्णतेचा भडका लागत आहे.
विशेष बाब म्हणजे परळी शहरातील जुन्या गाव भागातील फिडर वर जास्त लोड असल्यानेच या भागातील वीज पुरवठा सतत खंडित होत आहे. या भागात सर्व नागरिकांतुन मात्र विद्युत विभागातील मनमानी कारभारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.विशेष बाब म्हणजे या जुन्या गाव भागात सर्वात जास्त गणेशपार काळरात्री फिडर चे विद्युत पुरवठा दिवसातून अनेक वेळेस बंद केला जात आहे त्यामुळे एकतर कोरोनाचे काळ आणि दुसरीकडे वीज बंद असल्याने उष्णतेचा मार म्हणल्यागत हाल या भागातील नागरिकांचे होत आहे. तरी वरिष्ठ अधिकारी अभियंत्यांनी या बाबीकडे लक्ष द्यावे अशी संतप्त मागणी या भागातील नागरिकांतून केली जात आहे.