परळीत धनुभाऊंचा सेवाधर्म; आणखी दहा कुटुंबांना प्रत्येकी 10 हजार रुपये विवाह अर्थसहाय्य निधी वितरित
परळीत धनुभाऊंचा सेवाधर्म; आणखी दहा कुटुंबांना प्रत्येकी 10 हजार रुपये विवाह अर्थसहाय्य निधी वितरित
ना. धनंजयजी मुंडे साहेबांची ही सेवा परळीकर कधीच विसरणार नाहीत – ऍड. गोविंद फड
मदत स्वीकारताना कुटुंबियांच्या डोळ्यात आले आनंदाश्रू…
परळी (दि. 26) —- : परळी येथे कोरोना काळात राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या सेवाधर्म उपक्रमांतर्गत आज आणखी 10 गरजू कुटुंबांना प्रत्येकी दहा हजार रुपये विवाह अर्थसहाय्य निधी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. गोविंदराव फड यांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
कोरोनाच्या कठीण काळात ना. धनंजयजी मुंडे साहेब सर्वार्थाने पार पाडत असलेला हा सेवाधर्म परळीकर जनता कधीच विसरणार नाही, असे यावेळी बोलताना ऍड. गोविंदराव फड म्हणाले.
कोरोना बाधित होऊन आलेल्या नागरिकांच्या कुटुंबातील विवाहास अर्थसहाय्य म्हणून सेवाधर्म उपक्रमांतर्गत हे दहा हजर रुपये अर्थसहाय्य ना. मुंडेंच्या वतीने देण्यात येते. आतापर्यंत 20 हून अधिक कुटुंबांना याचा लाभ मिळाला आहे.
एकीकडे कोरोनाशी झुंज देऊन आलो आणि त्यानंतर घरातील विवाहासाठी लागणारा खर्च या सर्व ताणतणावाच्या परिस्थितीत कोरोनाच्या लढाईपासून ते घरातल्या लग्नाला सुद्धा धनंजयजी मुंडे साहेबांनी आधार दिला, असे सांगताना लाभार्थी कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती ऍड. गोविदनराव फड, रा.कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, नगरसेवक अजिझ कच्छी, नितीन रोडे, गोविंद कुकर, सरचिटणीस अनंत इंगळे, राष्ट्रवादी सेवादलचे अध्यक्ष लालाभाई पठाण, जितेंद्र नव्हाडे, शरद कावरे, सचिन आरसुळे यांच्यासह विवाह सहाय्य निधी प्राप्त कुटुंबीय उपस्थित होते.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजयजी मुंडे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली परळी शहरात ‘सेवाधर्म… सारं काही समष्टीसाठी’ या उपक्रमात सुसज्ज असे महिला व लहान मुलामुलींकरीता मोफत कोविड केअर सेंटर, फ्रंट लाईन वर्कर्स यांना कोरोना सुरक्षा किट आरोग्यसेवकांना टिफिन बॉक्स, कोरोनाबाधित व कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना प्रोटीन बँक द्वारे अंडी व मटकी घरपोच,गरजू कुटूंबांना प्रत्येकी 10000 रू विवाह सहाय्य निधी, हॅलो डॉक्टर टेलमेडिसिन हेल्पलाईन सेवा, मोफत निर्जंतुकिकरण यासह अनेक कोविड सेवा सेवाधर्म टीमच्या वतीने सुरु असून परळीची कोविड मुक्ततेकडे वाटचाल होत असल्याने नागरिकांमध्ये सकारात्मक भाव निर्माण झाला असून बाधित कुटुंबियांना दिलासा व आधार मिळत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.