परळी ब्लड डायरी तर्फे उद्या परळीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
परळी ब्लड डायरी तर्फे उद्या परळीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
परळी (प्रतिनिधी) :- दि २८ मे २०२१ कोरोना च्या पार्श्वभूमीवर रक्ततुटवड्याचे संकट लक्षात घेऊन परळी ब्लड डायरी तर्फे आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आला आहे जमाते इस्लामी हिंद परळीचा कार्यालयात रक्तदान शिबिरचा आयोजन करण्यात आलेला आहे सकाळी 10 ते दुपारी 04 पर्यंत हा रक्तदान शिबिर परळी ब्लड डायरी व इतर संघटना च्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात येत आहे जमात ए इस्लामी हिंद परळी, नय्यर ग्रुप ,खिदमत फाऊंडेशन , हजरत उमर फारुख ग्रुप, AK बॉईज, स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया परळी, टिपू सुलतान युवा मंच परळी, एम पी जे परळी. या सर्व संघटनांचा समावेश आहे.
रक्तदान शिबीर घेण्याचा उद्देश परळीत जेव्हा रक्ताची गरज असते तेव्हा स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय ब्लड बँक अंबाजोगाई तिथून रक्त पुरवठा केला जातो सध्या कोरोना महामारी मुळे रक्ततुटवड्याचे संकट लक्षात घेऊन परळी ब्लड डायरी च्या वतीने रक्तदान शिबिराचा आयोजन केलेला आहे तरी सर्व परळीकरांना खास करून युवकांना विनंती आहे जास्तीत जास्त रक्तदान करून या परिस्थितीत सामान्य जन माणूस व शासनाला मदतीचा हात द्यावा.