महिला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ. लक्ष्मण मुंडे यांची नियुक्ती

Spread the love

महिला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ. लक्ष्मण मुंडे यांची नियुक्ती

परळी वैजनाथ दि.०१ (प्रतिनिधी)
शहरातील राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक परिसरातील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ. लक्ष्मण मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नियुक्ती बदल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
येथील लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळाचे लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आर. जे.परळीकर यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाल्याने प्राचार्य पद रिक्त झाले होते. या जागी महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. लक्ष्मण मुंडे यांची संस्थेच्या वतीने नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्ती बदल संस्थेचे मार्गदर्शक अनिलराव देशमुख, अध्यक्ष संजय देशमुख, सचिव रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष प्रा.प्रसाद देशमुख यांच्यासह सर्व संचालक, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. या नियुक्ती बदल बोलताना प्राचार्य डॉ. लक्ष्मण मुंडे यांनी सांगितले की, महाविद्यालयाची गेल्या २४ वर्षांची गुणवत्तेची परंपरा कायम ठेवून स्वर्गीय प्राचार्या आर.जे.परळीकर यांच्या पावलावर पाऊल ठेवून महाविद्यालयाचा आलेख संस्थेच्या सहकार्याने आणखी वाढवून विद्यार्थिनींना दर्जेदार, गुणवत्ता पूर्ण शिक्षण देवून गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी प्रयत्नशील राहिल.

You cannot copy content of this page