सेवाधर्म : शहरात निर्जंतुकिकरण अभियानाचा शुभारंभ;१५ दिवसात गल्लोगल्ली करणार निर्जंतुकिकरण

Spread the love

सेवाधर्म : शहरात निर्जंतुकिकरण अभियानाचा शुभारंभ;१५ दिवसात गल्लोगल्ली करणार निर्जंतुकिकरण

स्वच्छता विभागाच्या कार्याला हातभार म्हणून फवारणी यंत्र लोकार्पण

परळी वैजनाथ, प्रतिनिधी…..
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून व गटनेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली “सेवाधर्म” हा कोविड प्रादुर्भावातील लोकोपयोगी उपक्रम सुरु असून या अंतर्गत परळी शहरात पुढील १५ दिवस निर्जंतुकिकरण अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा आज दि.१ शुभारंभ करण्यात आला. येत्या १५ दिवसात गल्लोगल्ली निर्जंतुकिकरण करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी सांगितले.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजयजी मुंडे यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या कोविड प्रादुर्भावतील लोकोपयोगी उपक्रम “सेवाधर्म” या मध्ये निर्जंतुकिकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कै.पंडितअण्णा मुंडे भोजनालय व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने कोविड प्रादुर्भावात परळी शहरातील विविध प्रभाग निर्जंतुकीकरण करण्यासाठी नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या कार्याला हातभार म्हणून फवारणी यंत्र लोकार्पण करण्यात आले.प्रभाग फवारणी अभियानाचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वैजनाथ सोळंके तसेच नगर परिषद कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच मिलिंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी रमेश कोमवार सर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या हस्ते एका गरजवंत कुटूंबाला 10000 रुपये विवाह सहाय्य निधी देण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, जिल्हा नियोजन समिती सदस्य वैजनाथ सोळके,माजी उपनगराध्य रविंद्र परदेशी,मिलिंद विद्यालयाचे नवनिर्वाचित मुख्याध्यापक रमेश कोमवार, सरचिटणीस अनंत इंगळे, महादेव रोडे,संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य रमेश चौंडे,नितीन रोडे,कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे,माजी नगरसेवक जालिंदर नाइकवाडे, रवी मुळे,सचिन स्वामी, सचिन आरसुळे, अमर रोडे,धम्मा अवचारे, निलेश जयराम, महेंद्रसिंग वाल्मिकी, मुख्तार पानगावकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page