पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतिने बेल वृक्षाचे रोप वाटप
पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतिने बेल वृक्षाचे रोप वाटप
परळी (प्रतिनिधी)
दि.5 जुन रोजीच्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जेष्ठ मार्गदर्शक चंदुलाल बियाणी यांच्या माध्यमातून राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने भगवान शंकराला प्रिय असलेल्या बेल वृक्षाचे (बिल्व पत्र) रोपटे वाटप करण्यात येणार आहेत. ऑक्सीजनची होत असलेली कमतरता, वृक्षारोपनाची वाढलेली गरज लक्षात घेवून मागेल त्याला या वृक्षाचे रोपटे देणार असल्याचे चंदुलाल बियाणी यांनी सांगितले.मागील दोन वर्षांपासून बियाणी यांच्या वतीने वृक्ष तुला करून अनेकांचे वाढदिवस साजरे करण्यात आले असून संपूर्ण मे महिना बियाणी यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांवर असलेल्या वृक्षांना संवर्धनाच्या दृष्टीकोनातून पाणी पुरवठा केला आहे.
5 जुन रोजी असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने न.प.सदस्य चंदुलाल बियाणी व राधा मोहन साथी प्रतिष्ठानच्या वतीने बेल वृक्षाचे रोपटे वृक्षारोपनासाठी दिले जाणार आहेत. 3 फुट उंचीचे व चांगली वाढ असलेले हे रोपटे काही वर्षातच मोठे होतात व त्यास शंकराला प्रिय असलेले तीन पानांचे बेल व फळही उपलब्ध होत असतात. भगवान शंकराला हे बेल फुल अत्यंत पवित्र असून परळी शहरात असलेले ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ प्रभूंचे अधिष्ठान व भाविकांतील शिवभक्ती लक्षात घेवून आपण नागरिकांना वृक्षारोपनासाठी बेल वृक्षाचे रोपटे देत असल्याचे चंदुलाल बियाणी यांनी सांगितले. दि.5 जुनला या उपक्रमाचा अधिकृत शुभारंभ होत असून रोपटे वितरण राजस्थानी मल्टीस्टेटच्या गणेशपार रोडवर असलेल्या उर्जा कॉम्प्लेक्समधील शाखेतून विनामुल्य होणार आहे. कोरोना आजार कालावधीत ऑक्सीजनची कमतरता मोठ्यघा प्रमाणात भासत असून जिथे घनदाट वृक्ष राजी असते तेथे ऑक्सीजन कधीच कमी पडत नाही हे लक्षात घेवून या वृक्षांचे वितरण होणार आहे.