लाँकडाऊन मधुन वगळून आडत दुकान व कृषी सेवा केंद्रांना पूर्णवेळ चालू ठेवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – वसंत मुंडे
लाँकडाऊन मधुन वगळून आडत दुकान व कृषी सेवा केंद्रांना पूर्णवेळ चालू ठेवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – वसंत मुंडे
परळी ( प्रतिनिधी) कोविड रोगा मुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आसुन शेतकऱ्यासाठी खरीप हंगाम पेरणीकरिता खते, बी-बियाणे, औषधी कीटकनाशके ,कृषी निविष्ठा विक्री केंद्र ,व महाराष्ट्रातील कृषी बाजार समितीचे व्यवहार शेतकऱ्यासाठी कायम सवरूपी चालू ठेवण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक विभाग यांनी महाराष्ट्र शासनाकडे मागणी केली आहे.खरीप 2021ची पेरणीचा मोसम योग्य वेळी सुरुवात होण्याची शक्यताआहे.शेतकऱ्यांना स्वतःचे माल आडत दुकाने बाजारपेठेत आणून विकुन टाकलल्या नंतर शेतकऱ्याच्या हातात पैसा येतो ,शेतकरी कृषी सेवा केंद्रावर जाऊन खते, बी बियाणे, औषधी, कीटकनाशके खरेदी करतो.पुन्हा शेतातील पेरणीची तयारी करावी लागते करिता महाराष्ट्रातील शासनाने कोविड १९ लॉक डाऊन नियमाच्या अंतर्गत अत्यावश्यक सेवा म्हणून शेतकऱ्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती व कृषी सेवा केंद्र पूर्णवेळ चालू ठेवण्याची परवानगी महाराष्ट्र शासनाकडे “खास बाब” म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ऊदवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे
मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केली आहे.