सेवाधर्म: ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्या परळीतील कोरोना योद्ध्याना आरोग्य विमा आणि जीवन विमा पॉलीसीचे वितरण

Spread the love

सेवाधर्म: ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्या परळीतील कोरोना योद्ध्याना आरोग्य विमा आणि जीवन विमा पॉलीसीचे वितरण

बुद्धपोर्णिमेनिमित्त निर्मित करण्यात आलेल्या पुस्तकाचेही ना. मुंडेंच्या हस्ते विमोचन

परळी (दि. 06) —- : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी मतदारसंघात सुरू असलेल्या सेवाधर्म उपक्रमांतर्गत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आपले प्राण पणाला लावून काम करणाऱ्या कोरोना योद्यांना आरोग्य विमा व जीवन विमा योजनेचा लाभ देण्यात येत असून, या विमा पॉलिसीचे वितरण ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्या (सोमवार दि. 07) रोजी परळी येथील महानिर्मिती विश्रामगृह (चेमरी रेस्ट हाऊस) येथे सकाळी 11 वा. होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस परळीच्या वतीने बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त वंदना सुत्रपठन या विशेष पुस्तकाचे विमोचनही ना. मुंडेंच्या हस्ते करण्यात येणार आहे.

ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सेवाधर्म हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत असून, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत, प्रभावी झालेल्या, रुग्ण, नातेवाईक, कुटुंब यांना विविध मार्गांनी मदत व दिलासा देण्याचे काम अविरत सुरू आहे.

सेवाधर्म उपक्रमांतर्गत कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना या काळात आधार मिळावा यासाठी रुग्णालयात काम करणारे नर्सिंग स्टाफ, स्वयंसेवक, रुग्ण वाहिका चालक, स्मशान भूमीमध्ये अंत्यविधी करणारे सेवक अशा एकूण 25 जणांना नामांकित कंपनीचा 5 लाख रुपयांचा कॅशलेस आरोग्य विमा व 2 लाख रुपयांचा जीवन विमा पॉलिसीचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते वितरण करण्यात येणार आहे.

तसेच तथागत गौतम बुद्धांच्या त्रिसरण, पंचशील, संविधान उद्देशिका आदी महत्वपूर्ण बाबींचा उल्लेख असलेल्या वंदना सुत्रपठण या विशेष पुस्तिकेचे ना. मुंडेंच्या हस्ते विमोचन करण्यात येणार असून, या पुस्तिकेच्या 5000 प्रति वितरित करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस परळीचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page