प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाथ शिक्षण संस्था संचलित वैद्यनाथ विधी महाविद्यालयाच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे दूरदृश्य प्रणाली द्वारे उद्घाटन
प्रधानमंत्री मा.नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नाथ शिक्षण संस्था संचलित वैद्यनाथ विधी महाविद्यालयाच्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे दूरदृश्य प्रणाली द्वारे उद्घाटन
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- व्यावसायिक शिक्षणातून कौशल्य विकास या संकल्पनेचा फायदा अधिकाधिक युवक-युवतींना होण्यासाठी आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये नाथ शिक्षण संस्था संचलित वैद्यनाथ विधी महाविद्यालय परळी वैजनाथ या ठिकाणी दूरदृश्य प्रणाली द्वारे देशाचे प्रधानमंत्री मा.श्री.नरेंद्र मोदी साहेब आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन संपन्न झाले.
कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या दृष्टिकोनातून प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर आचार्य चाणक्य कौशल्य केंद्र स्थापनेसाठी महाराष्ट्र शासनाने परळी वैजनाथ येथील महाराष्ट्र राज्य कृषीमंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ शिक्षण संस्था संचलित वैद्यनाथ विधी महाविद्यालयाची निवड केली आहे. नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे व समनव्यक प्राचार्य अतुल दुबे यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २० सप्टेंबर रोजी व्र्व्हच्युअल ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. यावेळी परळी नायब तहसीलदार पठाण मॅडम, समनव्यक प्राचार्य अतुल दुबे, प्रा. किरण शिंदे, प्राचार्य कदरकर सर तसेच विद्यार्थ्यांचे विशेष उपस्थिती होती.