प्रचार सोडून धनंजय मुंडे पोहचले आजारी जिवलग कार्यकर्त्याच्या मदतीला
प्रचार सोडून धनंजय मुंडे पोहचले आजारी जिवलग कार्यकर्त्याच्या मदतीला
शरद, काळजी करू नकोस, दोन दिवसात बरा होशील’ म्हणत रुग्णालयात जाऊन विचारपूस करत दिला धीर
शरद कावरेंना पुढील उपचारार्थ लातूरला केले शिफ्ट
परळी वैद्यनाथ (दि.04) – उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आणि त्यातच प्रचाराची धामधूम असताना स्वतः उमेदवार असलेल्या धनंजय मुंडे यांना आपला जिवलग कार्यकर्ता शरद कावरे एका आजारामुळे रुग्णालयात दाखल असल्याचे कळताच प्रचार सोडून धनंजय मुंडे यांनी थेट रुग्णालय गाठून आपल्या जिवलग सहकाऱ्याची भेट घेऊन चौकशी करून पुढील उपचारासाठी त्यांना लातूर येथे पाठवण्याची सोय करून दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच धनंजय मुंडे यांचे जिवलग सहकारी असलेले शरद कावरे यांना थायरॉईड व युरीन इन्फेक्शन मुळे अचानक त्रास होऊ लागल्याने आज कुटुंबीयांनी परळीतील डॉ. वैभव डुबे यांच्या दवाखान्यात ऍडमिट केले होते.
याबाबत माहिती मिळताच धनंजय मुंडे थेट डॉक्टर डुबे यांच्या रुग्णालयात पोहोचले. आपल्या नेत्याला अडचणीच्या काळात धावून आलेले पाहून शरद कावरे यांना रडू कोसळले. यावेळी धनंजय मुंडे यांनी शरद कावरे यांच्या पाठीवर थाप मारत त्यांना धीर दिला. ‘शरद तुला लगेच लातूरला शिफ्ट करतो, काळजी करू नकोस, दोन दिवसात बरा होऊन परत येशील’ असा विश्वास धनंजय मुंडे यांनी शरद कावरे यांना व त्यांच्या कुटुंबीयांना दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी हेही उपस्थित होते.
त्यानंतर पुढील काही मिनिटातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ॲम्बुलन्स मधून शरद कावरे यांना लातूर येथील विवेकानंद रुग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून ते लवकरच बरे होतील असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
अगदी अज्ञात व्यक्ती नाही अडचणीला मदत करणारे म्हणून धनंजय मुंडे सुपरीचीत आहेत. त्यातच निवडणुकीचा प्रचार सोडून आपल्या जिवलग कार्यकर्त्याच्या मदतीला धावून गेल्याचे वृत्त समजताच धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.