डॉ रेणुका भिमाशंकर फुटके हीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इन्सुरंस मेडिकल आँफीसर ग्रुप ए मध्ये महाराष्ट्रात प्रथम
डॉ रेणुका भिमाशंकर फुटके हीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इन्सुरंस मेडिकल आँफीसर ग्रुप ए मध्ये महाराष्ट्रात प्रथम
परळीचा शिरपेचात मानाचा तुरा
परळी वैजनाथ दि.११ (प्रतिनिधी)
शहरातील शास्त्रीनगर भागातील रहिवासी भिमाशंकर फुटके यांची कन्या डॉ रेणुका भीमाशंकर फुटके महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इन्सुरंस मेडिकल आँफीसर ग्रुप ए मध्ये महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान पटकावत परळीचा शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
शहरातील शास्त्रीनगर भागातील सेवानिवृत्त शिक्षक भिमाशंकर फुटके व आशा फुटके यांची कन्या डॉ रेणुका भीमाशंकर फुटके महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इन्सुरंस मेडिकल आँफीसर ग्रुप ए मध्ये महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. डॉ रेणुचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शहरातील न्यु हायस्कूल मध्ये तर उच्च माध्यमिक शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर तर वैद्यकीय शिक्षण मुंबई येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयात पूर्ण झाले. यानंतर डॉ रेणुकाने मुंबई येथे प्रँक्टीस करत २०२३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या इन्सुरंस मेडिकल आँफीसर ग्रुप ए ची परिक्षा दिली होती. यापरिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परिक्षेत महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
भिमाशंकर फुटके यांच्या चारही मुली उच्च शिक्षीत