सिरसाळ्याचे सरपंच पट्टेदार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाने परळी विधानसभेचा नूर पालटला- राजेसाहेब देशमुख
सिरसाळ्याचे सरपंच पट्टेदार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाने परळी विधानसभेचा नूर पालटला- राजेसाहेब देशमुख
सिरसाळा परिसरात महाविकास आघाडीचे पारडे जड; अभूतपूर्व रॅली
परळी (प्रतिनिधी):- परळी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या सिरसाळा ग्रामपंचायचे सरपंच अन्वर पट्टेदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने परळी विधानसभेचा नूर पालटला आहे. सिरसाळ्यातील विज प्रश्न, पाणी प्रश्न, रस्ते ,आरोग्य व्यावस्था ,उद्योग, बसस्थानक, बॅंक, यासह इतर प्रश्न मार्गी लावणारआहे. पट्टेदार यांच्या प्रवेशाने निश्चितच महाविकास आघाडीला बळकटी मिळणार असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याचा फायदा आम्हाला होणार असल्याचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजसाहेब देशमुख यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले. मी सरपंच झाल्यापासून गेल्या दोन वर्षापासून मला त्रास सुरू झाला या त्रासामुळे मी व माझ्या सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परळी तालुक्यातील सिरसाळा गाव विकासापासून नेहमी दूर ठेवण्यात आलेले आहे .याला केवळ आणि केवळ धंनजय मुंडे जबाबदार आहेत. असल्याचे सरपंच पट्टेदार यावेळी म्हणाले.
याप्रसंगी ॲड. माधव जाधव,ॲड. अजय बुरांडे, उत्तम माने,काॅ.बडे, वैद्यनाथ देवल कमिटीचे विश्वस्त राजेश देशमुख, आय्यासभाई, शिवसेना नेते नारायण सातपुते ,माजी जि.प. कपिल चोपडे यांची भाषणे झाली. या वेळी सरपंच अन्वर पट्टेदार यांच्या सह बाबा शिंदे,देवराव लुगडे महाराज,मुन्ना काळे सर ,प्रमोद किरवले, बाळासाहेब पांडे , ग्रामपंचायत सदस्य महम्मद शरीफ, तौफिक भाई कुरेशी,इम्रान सय्यद, अजमत भाई मशाक , अशफाक पठाण,केशव बन्सोडे, राजेभाऊ ऊजगरे आदीसह अनेकजण उपस्थित होते .
गेल्या 15 वर्षात परळी विधानसभा मतदार संघात कसल्याच प्रकारचा विकास झाला नाही. जनता दडपणामध्ये आहे. परंतु या सर्वसामान्य कुटुंबातील शिक्षकाच्या, शेतकऱ्याच्या मुलाला महाविकास आघाडीने तिकीट दिले आहे. शिरसाळा परिसरात नुसत्या घोषणांचा पाऊस व आश्वासनांचे गाजर दाखवले. परळी एमआयडीसीचे भिजत घोंगडे कायम ठेवण्याचे काम जाणीवपूर्वक केले. शिरसाळा परिसरात रोजगार उपलब्ध करून तालुक्याची शान वाढविण्यासाठी मतदानरूपी आशीर्वाद देऊन साथ घ्या अशी भावनिक साद काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केले.
कृषिमंत्री यांनी खोटे आश्वासन देऊन अनेक समाजाची दिशाभूल केली आहे. रस्त्याची कामे झाली नाहीत. कामे अर्धवट अवस्थेत असल्याने नागरिकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. मला भरभरुन आशीर्वाद द्या मी मी आपली कामे सेवक म्हणून इमाने इतबारे करणार आहे. यावेळी नागरिकांची प्रचंड गर्दी होती तर यावेळी युवकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला. याप्रसंगी शिरसाळा व परिसरातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. प्रचार रॅलीस मोठ्या संख्येने शिरसाळा सर्कलमधील मतदार बंधू भगिनी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
गावभर प्रचार रॅली
काल झालेल्या सोहळ्यात प्रवेश करुन उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत गावभर प्रचार रॅली काढली ,ह्या प्रचार रॅलीत दोन हजार लोक सहभागी होते. दर्ग्यात देशमुख यांचा प्रचाराचा नारळ वाढवून हनुमान मंदिर, टिप्पू सुलतान चौक, ईदगाह चौक,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर चौक असे मार्गस्थ होत गावभर रॅली काढण्यात आली. फटाक्यांची अताषबाजी,तोफांचे बार, ढोल ताशे आणि राजेसाहेब देशमुख तुम आगे बढो च्या घोषणेने सिरसाळा दणाणून गेले होते . ह्या रॅलीने सिरसाळ्यातील लोकांचे लक्ष वेधून घेतले होते . अन्वर पट्टेदार यांचा पक्ष प्रवेश दिमाखात पार पडला आहे . पट्टेदार यांच्या निवासस्थानी रॅलीचा समारोप झाला , ह्या समारोपा वेळी उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी सिरसाळा विकासाचे व्हिजन सांगत आपले मनोगत व्यक्त केले .