वैद्यनाथचा ओंकार झाला आता तरी कारखान्याला त्रास देऊ नका – पंकजाताईंचे भावनिक आवाहन

Spread the love

वैद्यनाथचा ओंकार झाला आता तरी कारखान्याला त्रास देऊ नका – पंकजाताईंचे भावनिक आवाहन

वैद्यनाथ कारखाना कधीच बंद पडू देणार नाही – बाबुराव बोत्रे पाटील

परळी प्रतिनिधी. परळी तालुक्याची कामधेनु म्हणून ओळख असलेला तसेच गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न असलेला व त्यांनी सुरू केलेला वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आता ओंकार साखर कारखाना प्रा लिमिटेड प्रायव्हेट लिमिटेड ग्रुपचा झाला आहे. कारखान्यात बसून अनेकांनी राजकारण केले. त्यामुळे कारखाना तोट्यात गेला असे सांगत आता तरी वैद्यनाथ कारखान्याला त्रास देऊ नका असे भावनिक आवाहन वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आमदार पंकजाताई मुंडे यांनी केले. तर वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना यापुढे कधीही बंद पडू देणार नाही अशी ग्वाही ओमकार सहकारी साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड ग्रुपचे चेअरमन बाबुराव धोत्रे पाटील यांनी दिली. आज वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या रोलिंग पुजन पंकजाताई मुंडे व बाबुराव बोत्रे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

 याप्रसंगी पुढे बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की,वैद्यनाथचे नाव घेतले तरी अंगावर शहारे उभे राहतात . वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा परळी तालुक्यासाठी कामधेनु होता. मुंडे साहेबांच्या नंतर अनेक अडचणींना तोंड देत मी हा कारखाना चालविला. इथे बसून काहीजण राजकारण करीत होते. काही कर्मचारी चुकीचे लाभले त्यामुळे साखर कारखाना तोट्यात गेल्याचे त्या म्हणाल्या. 

 कारखाना अडचणीत असताना सरकारला मदत मागितली पण ती मिळाली नाही.इतर कारखान्यांना मदत मिळाली .परंतु वैद्यनाथला नाही.मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर दुष्काळ सुरू झाला.साखर पाडून घेतली.कोट्यावधी रुपये खर्च करून कारखाना सुरू करणार होते तोच गेल्या वर्षी कारखान्यावर रेड पडली.ज्यांचा काही संबंध नाही तेही वसुली साठी येत होते.आता वैद्यनाथचा ओमकार झाला.बोत्रे पाटलांनी महाराष्ट्रातील अनेक कारखाने चालवायला घेतले आहेत. आणि ते यशस्वीपणे पुढे मुंडे साहेबांनी स्थापन केलेला हा कारखाना चालवतील. कारखान्याच्या चिमणीतून धूर निघाला म्हणजे मुंडे साहेबांचे अस्तित्व जाणवते असे भावनिक उद्गारही त्यांनी यावेळी काढले.

 मुंडे साहेबांचे कार्यालय वापरू नका.माझे बाबा ज्या ऑफिसमध्ये बसत होते त्याचा सन्मान ठेवा.उद्यापासून आमचं काही चालणार नाही पण सर्वांचा ऊस बोत्रे पाटील नेतील.लोकांनी बोत्रे पाटलांना डिस्टर्ब करू नये.कारखान्यामुळे व्यापार पेठेवरही परिणाम झाला.आता कारखान्याचे मी मालक नाही तर एक्झिक्युटिव्ह अडव्हाइजर आहे.

  याप्रसंगी ओंकारचे चेअरमन बाबुराव धोत्रे म्हणाले की,कारखाना सुरू होण्यासाठी पंकजाताई मुंडे यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांच्या सहकार्यामुळे हा कारखाना मला चालवण्यासाठी मिळाला आहे. ओमकार समूहाच्या वतीने यावर्षी महाराष्ट्रात 70  लाख हा मॅट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्याचे सांगतानाच ओमकार समूहात 10 हजार कर्मचारी काम करत असल्याचे सांगितले.25 नोव्हेंबर रोजी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना सुरू होणार असून आपला उच्चांकी बाजार भाव राहील हे सांगतानाच उपस्थित त्यांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या.यापुढे कारखाना कधीच बंद पडणार नाही याचीही मी जबाबदारी घेतो असे बोत्रे पाटील म्हणाले. 

  कार्यक्रमास विद्यमान संचालक मंडळातील अनेक सदस्य ओंकार समूहातील मान्यवर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजीराव गुट्टे यांनी केले.सूत्रसंचालन ज्ञानोबा सुरवसे यांनी तर आभार ओमकार समूहाचे जनरल मॅनेजर लोखंडे यांनी मानले.

You cannot copy content of this page