स्था.गु.शाखेची मोठी कारवाई;१६ लाखांच्या गुटख्याचा ट्रक पकडला

Spread the love

परभणी जिल्ह्यातील ढालेगांवातील धाड; २० लाख ९७ हजाराचा मुद्देमाल जप्त; तीन जणांविरुद्ध पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल

पापरभणी/ प्रतिनिधी

स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सोमवार (ता.७) रोजी अगदी पहाटेच्या सुमारास पाथरी–माजलगाव मार्गावर ढालेगाव येथे धाड टाकून १५ लाख ९२ हजार रुपयांचा गुटखा घेऊन जाणाऱ्या एक ट्रक असा तब्बल २० लाख ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात तीन आरोपींवर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरिक्षक गोपीनाथ वाघमारे, पोलीस अंमलदार विलास सातपुते, गजानन क्षीरसागर, विष्णु चव्हाण, नामदेव डुबे, संजय घुगे, मधुकर ढवळे, सिध्देश्वर चाटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना या पथकाला चारचाकी वाहनामधुन गुटखा पाथरी आणला जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी एम. एच. २८ बी.बी. ५४३८ या क्रमांकाचे वाहन थांबविले. सदर वाहनात १५ लाख ९२ हजार रुपयांचा गुटखा होता. या प्रकरणी पोलिस हवालदार विलास सातपुते यांच्या फिर्यादीवरून परवेज खान व इतर दोन अशा तीन जणांवर पाथरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे.प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक कुलकर्णी करीत आहेत.

You cannot copy content of this page