तीस वर्षांनंतर दोन महान नेत्यांची ग्रेट भेट

Spread the love

भीमाशंकर नावंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ऐतिहासिक संवाद

परळी वैजनाथ/प्रतिनिधी
तीस वर्षांपूर्वी भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेणारे परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे परचुंडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रेस फोटोग्राफर श्री भीमाशंकर आप्पा नावंदे यांना, 14 नोव्हेंबर 2024 रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याचा ऐतिहासिक योग आला.

श्री नावंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले, “अटलजींना भेटल्यापासून त्यांचे विचार आणि कार्य नेहमीच माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांच्याकडून मिळालेली शिकवण आणि त्यांचे नेतृत्व आजही मला मार्गदर्शन करते. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी ही भेट अत्यंत प्रेरणादायक होती आणि त्यांच्याशी संवाद साधणे एक अविस्मरणीय अनुभव होता. यामुळे मी अत्यंत आनंदी आहे.”

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींशी झालेल्या या भेटीने श्री नावंदे यांच्यासाठी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण सिद्ध झाला आहे.

ही भेट माझ्यासाठी केवळ एक स्मरणीय क्षण नव्हे, तर ती भारतीय राजकारण आणि समाजकार्य क्षेत्रासाठी एक नवी प्रेरणा ठरली आहे अशी प्रतिक्रिया नावंदे यांनी दिली. या ऐतिहासिक भेटीमुळे त्यांचे विचार आणि कार्य नेहमीच प्रेरणा देणारे ठरेल असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण गेल्या ३० वर्षापासून भाजपचे सक्रिय काम करीत आहोत. परचुंडी या आपल्या गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही नावंदे यांनी दिली.

You cannot copy content of this page