हायटेक शाळेच्या संस्थाचालक दाम्पत्यास ३ दिवसांची पोलीस कोठडी
परभणी जिल्ह्यातील झिरोफाटा येथील हायटेक निवासी शाळेतील खुन प्रकरण; प्रभाकर चव्हाण व रत्नमाला चव्हाण जेरबंद
पूर्णा ता.२२(प्रतिनिधी)परभणी जिल्ह्यातील झिरोफाटा येथील हायटेक निवासी शाळेतील हभप.जगन्नाथ महाराज खुन प्रकरणात अटकेत असलेले शाळेचे संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्याची पत्नी प्राचार्य रत्नमाला चव्हाण यांना (ता.२२) रोजी मा.पूर्णा न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

परभणी तालुक्यातील उखळद येथिल हभप.जगन्नाथ पांडुरंग हेंडगे हे मुलीची टि.सी. काढण्यासाठी झिरो फाटा येथील हायटेक रेसिडेन्शीयल शाळेत गेले होते. या ठिकाणी संस्था चालक प्रभाकर त्यांच्या चव्हाण, पत्नीने प्रवेशावेळीची उर्वरित रक्कम मारहाण केली. यात जगन्नाथ हेंडगे यांचा मृत्यू झाला. पूर्णा पोलीसांत खुनाचा गुन्हा दाखल झाल्या नंतर चव्हाण दांम्पत्य फरार झाले होते. आरोपींच्या अटकेसाठी मोर्चा देखील काढण्यात आला.

पोलीसअधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी स्वतः जातीचे या प्रकरणात लक्ष घातले.आरोपींच्या शोधासाठी नऊ पथकं तयार करण्यात आली.सोमवारी सायं पुणे येथून पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील पोनि.विवेकानंद पाटील,सपोनि.पांडुरंग भारती, सपोनि. राजू मुत्तेपोड, पोउपनि. चंदनसिंह परिहार, गोपीनाथ वाघमारे, पोलीस अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, सावन दुधाटे, रेड्डी, कौटकर यांच्या पथकाने ताब्यात घेऊन पूर्णा पोलीसांच्या स्वाधीन केले.मंगळवारी ता.२२ रोजी पूर्णा पोलिसांनी येथील मा.गजानन जाणकार यांच्या न्यायालया समोर हजर केले असता मा. न्यायालयाने संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्याची पत्नी रत्नमाला चव्हाण यांना ता.२५ जुलै पर्यंत एकूण ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ समाधान पाटील हे करत आहेत.