अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची छापेमारी;२ दिवसांत ३ टिप्पर पकडले

Spread the love

पूर्णा पोलिस,स्था.गु.शाखेची कारवाई;१५ लाखांचा मुद्देमाल जप्त;गुन्हा दाखल

पूर्णा(प्रतिनिधी)

  • तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतुक होत असल्याने पोलिसांनी मागील दोन दिवसांत छापेमारीचे सत्र सुरू केले आहे.पूर्णा पोलीसांच्या दिमतीला स्था.गु.शाखेचे पथकही कारवाईसाठी हजर झाले असून कानडखेड,पूर्णा, पिंपळगाव (बा) येथे पथकाने कारवाई करत वाळू वाहतूक करणारे ३ टिप्पर असा एकूण १५ लाखांचा मुद्देमाल जप्त करीत पूर्णा पोलीस ठाण्यात संबंधित वाहन चालक मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
  • पूर्णा तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी व पूर्णा नदी पात्रात होत असलेल्या अवैधरित्या वाळू उपसा करुन विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर चाप बसण्यासाठी पूर्णा पोलीस सरसावले आहेत.त्यांच्या दिमतीला स्थानिक गुन्हा शाखेचे पथकही हजर झाले आहे. पोलीसांच्या पथकाने गुरुवारी व शुक्रवारी मध्यरात्री अवैधरित्या विनापरवाना वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा छडा लाऊन तालुक्यातील मौजे पिंपळगाव (बा) शिवारात ता.१६ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास विनापरवाना वाळू घेऊन जाणारा टिप्पर क्र. एम.एच.२४/एफ/७२६४ ला पाठलाग करत पकडून पूर्णा पोलीस ठाण्यात स्था.गु.शाखेचे पो.काॅ.हनुमान ढगे यांच्या फिर्यादीवरून टिप्पर चालक मालकांवर गुन्हा दाखल केला आहे.तर कानडखेड शिवारात हायवा क्र. एम.एच.२०/ए.टी/०९०२ सुमारे ५ ब्रास वाळू घेऊन जात असताना रंगेहाथ पकडले.पो.काॅ.माधव अक्कलवाड यांच्या फिर्यादीवरून टिप्परचे अज्ञात चालक व मालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.तर रात्री पूर्णा शहरातील अमृतनगर भागात ता.१७ रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास रात्र गस्तीवर असलेल्या पोलीसांनी एम.एच.४/ईएल/६६७३ क्रमांकाचे २ ब्रास वाळूने भरलेला पांढ-या केशरी रंगाचा टिप्पर पकडून फौजदार वाल्मीक भोसले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला,असुन वरील तीनही टिप्पर व वाळू मिळून एकत्रितपणे सुमारे १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.सदरील कारवाई ही जि.्पो.अ.रविंद्रसिंह परदेशी यांच्या आदेशाने, अप्पर पो.अ.यशवौत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णा पो.नि.विलास गोबाडे,स्था.गु.शा पो.नि.विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून, यावेळी सपोनी.सोमनाथ शिंदे,फौजदार चंदनसिंह परिहार, फौजदार प्रकाश इंगोले, फौजदार वाल्मीक भोसले,पोकाॅ.हनुमान ढगे,पोहेकाॅ.रंगनाथ दुधाटे,पोकाॅ. सचिन भदरगे,पोहेकाॅ श्याम कुरील, पोकाॅ.माधव अक्कलवाड, पोकाॅ. गजानन क्षिरसागर,पोकाॅ.मुंढे आदींनी सहभागी होते.तीनही गुन्ह्याचा तपास पूर्णा पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page