रेल्वे प्रवासात कागदी,ज्युट पिशव्यासह डिजिटल टिकीट वापरा-नांदेड विभागीय व्यवस्थापक प्रदिप कामले

Spread the love

पूर्णा(प्रतिनिधी)

नांदेड रेल्वे विभागात प्लास्टिक प्रदूषण संपवून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कागदी पिशव्या किंवा  ज्यूट च्या पिशव्या वापरण्याचे प्रवाशांना आवाहन, नांदेड रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक प्रदिप कामले यांनी प्रवाशांना केले आहे.

    नांदेड रेल्वे विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, विविध स्थानकावर”प्लास्टिक प्रदूषण संपवा” या विषयावर आधारित १५ दिवसांच्या जनजागृती मोहिम हाती घेतली आहे.या मोहीमेला कागदविरहित आणि डिजिटल तिकीट काढण्यास प्रोस्ताहन देण्यात  येत आहे.नांदेड विभागातील नांदेड, पूर्णा, परभणी, जालना, औरंगाबाद आणि नगरसोल रेल्वे स्थानकांवर जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यात प्रवाशांनी भरपूर प्रतिसाद दिला. या मोहिमेअंतर्गत रेल्वे स्थानकांवर कागदी पिशव्या किंवा  ज्यूट च्या पिशव्या वापरण्यचे प्रवाशांना आवाहन करण्यात आले. तसेच, प्लास्टिक च्या पिशव्या वापरल्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी विषयी त्यांना माहिती देण्यात आली. या प्रसंगी काही प्रवाशांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

तसेच रेल्वे गाड्यामध्ये प्रवास करण्याकरिता तिकीट काढतांना कागदविरहित आणि युटीएस डिजिटल तिकीट काढण्यास प्रोस्ताहन देण्या करिता जनजागृती करण्यात आली.आरक्षित तिकीटाकरिता IRCTC च्या संकेत स्थळावरून डिजिटल तिकीट काढता येते या विषयी माहिती देण्यात आली.

ही मोहीम प्रवाशांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि स्वच्छ, हरित भविष्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन विभागीय व्यवस्थापक प्रदिप कामले यांनी केले आहे.

You cannot copy content of this page