अल्पवयीन मुलीचे अत्याचार प्रकरण; पूर्णेतील आरोपीस १४ वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा

Spread the love

पूर्णा (प्रतिनिधी)
शहरातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तीला गर्भवती करणाऱ्या आरोपीला परभणी मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एस.नायर यांनी १४ वर्ष सश्रम कारावास व २५ हजार रूपये दंड आणि दंड न भरल्यास १ वर्ष साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. बुधवार १२ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने या प्रकरणी आपला निकाल दिला आहे.
पूर्णा शहरात ऑगस्ट २०१९ मध्ये एका अल्पवयीन मुलीने पूर्णा पोलीस स्टेशन येथे जबाब दिल्या नुसार. सदर मुलगी, तीचे वडील व नातेवाईकांसोबत पूर्णा शहरात राह होती. वडिल दिवसभर कामाला बाहेर असतात. तर काकाची प्रकृती बरी नसल्याने काका काकु एका ठिकाणी असतात. याच एकांताचा फायदा घेत आरोपी मनोज लक्ष्मण रौत्रे याने पिडितेसोबत बळजबरी संबंध ठेवले. यादरम्यान पिडिता गर्भवती झाली. तिने एका बाळालाही जन्म दिला. यानंतर आरोपी विरोधात पूर्णा पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कलम कायद्यानुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोनि. सुभाष राठोड यांनी तपास केला. सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. बाळाचा डिएनए व इतर बाबी महत्वाच्या ठरल्या. न्यायालयाने आरोपी मनोज लक्ष्मण रौत्रे याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे मुख्य सरकारी अभियोक्ता अॅड. ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. आनंद गिराम यांनी काम पाहिले. . या प्रकरणात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि. सुरेश चव्हाण, पोलीस अंमलदार प्रमोद सुर्यवंशी, राजीव दहीफळे, वंदना आदोडे यांनी काम पाहिले.

You cannot copy content of this page