प्रज्वल आंबोरेचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश
पूर्णा ता.११(प्रतिनिधी)
९जुलै रोजी शिष्यवृत्ती अंतरिम निकालामध्ये विद्याप्रसारणी सभा शाळेतील प्रज्वल आंबोरे पाचवी गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षेत पूर्णा येथून प्रथम क्रमांकासह तर तालुक्यातून शहरी विभागात प्रथम क्रमांक मिळवत शिष्यवृत्तीधारक झाल्याबद्दल शाळेत विद्या प्रसारिणी परिवारातर्फे मुख्याध्यापक हिंडणे यांनी त्यांचा गौरव केला यावेळी ढोणे सर, शिवप्रसाद ठाकुर सर,आहेर सर.अंभोरे सर आदींची उपस्थिती होती.शाळेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल प्राज्वलचे संस्था अध्यक्ष डॉ.विनय वाघमारे साहेब, उपाध्यक्ष भीमरावजी कदम साहेब, सचिव श्रीनिवासजी काबरा या सर्वांनी या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.