आमेर चाऊस यांची फौजदारपदी पदोन्नती
पूर्णा(प्रतिनिधी)
येथिल पोलीस ठाण्यात स.पो.उप.नि म्हणून कार्यरत असलेले आमेर चाऊस यांना श्रेणी फौजदार पदावर पदोन्नती मिळाली आहे.त्यांच्या पदोन्नती नंतर येथील पो.नि. विलास गोबाडे यांनी त्यांच्या खांद्यावर तीन स्टार लावून त्यांना गौरविले आहे. परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिल्हा पोलीस दलात आस्थापनेवर कार्यरत असलेल्या तब्बल १७ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांना, श्रेणी फौजदार पदावर नुकतीच पदोन्नती दिली आहे. यामध्ये पूर्णा पोलीस ठाण्यातील आहेरवाडी बिट जमादार सपोउपनि. अब्दुल आमेर अब्दुल हबीब चाऊस यांची वर्णी लागली आहे. त्यांनी जिल्हा पोलीस दलात ३० वर्षे सेवा बजावली आहे. त्यामध्ये ३ वर्ष सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा ही पूर्ण केली आहे. त्यांच्या पदोन्नतीचे पत्र प्राप्त होताच पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी त्यांच्या खांद्यावर तीन स्टार लावून त्यांचा गौरव केला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शिंदे बीट जमादार रमेश मुजमुरे पत्रकार मोहन लोखंडे, गजानन हिवरे आदींची उपस्थिती होती.