फौजदार आमेर चाऊस यांचा गौरव
पूर्णा पोलिस ठाण्यात सत्ताकाराचे आयोजन
पूर्णा (प्रतिनिधी)
येथिल पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहा.पोलीस उपनिरीक्षक आमेर चाऊस यांना फौजदारपदी पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच पूर्णा शहरातील सर्वच स्थरावरील नागरिकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
सहा.पो.उपनिरीक्षक अ.आमेर अ. हबीब चाऊस हे मागील काही वर्षांपासून कार्यरत आहेत.आपली सेवा बजावत असताना जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी त्यांची फौजदारपदावर पदोन्नती दिली आहे.त्यांना फौजदार पदांची बढती मिळाल्यावर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील,पो.नि.विलास गोबाडे,सपोनि. सोमनाथ शिंदे, रामकृष्ण नांदगावकर, फौजदार श्रीनिवास पडलवार, सुरजीत सिंह माळी,वाल्मीक भोसले ,पुणेकर, श्रीमती डुकरे, मिनाक्षी राखोंडे, बीट जमादार अण्णा माने,श्याम काळे, रमेश मुजमुले, अक्षय वाघ, ठाणे अंमलदार, वाघमारे, मोरे,रमाकांत तोटेवाड, विजय रणखांब, मंगेश जुकटे,अजय माळकर, खनपटे,संदिप चौरे,जाधव ,लांडगेवाड, रशिद लाला आदींनी गौरव करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शहरातील आजी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते , पोलिस पाटील, होमगार्ड, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.