मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पूर्णेतील आडत व्यापाऱ्यांचा जाहीर पाठिंबा

Spread the love

मार्केट यार्ड दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय

पूर्णा ता.२८(प्रतिनिधी)मराठा आरक्षणासाठी सातत्याने संघर्ष करत असलेले संघर्ष योद्धा मनोज जरराग पाटील यांच्या लढ्याला पूर्णा शहरासह तालुक्यात जोरदार पाठींबा मिळत आहे.(Public support of traders blocking Maratha warrior Manoj Jarange Patal’s agitation)जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आमरण उपोपणाला पाठिंबा मिळत आहे.तालुक्यातील अनेक गावातुन समाजबांधवांनी मुंबई कडे कुच केली आहे.त्यासोबतच पूर्णा येथील आडत व्यापारी असोसिएशन फर्टीलायझर असोशियन यार्ड मधील सर्व व्यापाऱ्यांनी दोन दिवस मार्केट वार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे पाटील आमरण (ता.२९) पासुन उपोषणास बसणार आहेत. त्यांच्या मागण्यांना शासनाने तात्काळ मान्यता द्यावी, यासाठी आडत व्यापाऱ्यांनी आपला ठाम पाठिंबा व्यक्त केला आहे. व्यापाऱ्यांनी बंदद्वारे शासनापर्यंत मराठा समाजाच्या भावना पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर आडत व्यापारी असोसिएशनतर्फे दि.२८ ऑगस्ट रोजी तहसीलदार तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीला निवेदन देण्यात आले. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष न करता तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका निवेदनाद्वारे व्यापाऱ्यांनीव्यक्त केली आहे.यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.जयप्रकाश मोदानी, जब्बारशेठ थारा,विजयकुमार कदम, अमृतराज कदम, नागनाथ भालेराव, रत्नाकर आप्पा एकलारे, बाबुराव आगलावे,माऊली कदम, अशोक अग्रवाल, बंडू कदम, भगवान मुंदडा, जुगलसेठ मुंदडा, पवन डांगे, हरिभाऊ कदम, विशाल चितलांग, कैलास आगलावे, माणिक कदम, साई बोबडे, मारुती भोसले, रुपेश पाथरकर, चंद्रकांत आप्पा एकलारे, अनिल कदम यांच्यासह मोठ्या संख्येने आडत व्यापारी उपस्थित होते.

You cannot copy content of this page