मोक्याच्या जागेवरील शेतासाठी चुलता व चुलत भावांनी भावालाच चोपले

Spread the love

चुडावा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळा भत्या येथिल घटना; गुन्हा दाखल

पूर्णा(प्रतिनिधी)

बळजबरीने लावलेला नांगर अडकल्याने काकाची पुतण्याला मारहाण काका सह तीन चुलत भावांवर चुडावा पोलिसांत गुन्हा दाखल पूर्णा;प्रतिनिधी स्वतःच्या हिस्स्याला भाव‌ हिस्स्याने वाटुन आलेल्या जमीनीवर जबरदस्तीने ट्रॅक्टरने मोगडा लाऊन शेत नांगरत असलेल्या सख्ख्या चुलत्यास विरोध करणा-या एका ४२ वर्षीय पुतण्याला चुलता व चुलत भावांनी बेधम मारहाण करून जखमी केल्याची घटना पूर्णा तालुक्यातील मौजे पिंपळा भत्या येथे घडली आहे.याप्यकरणी चुडावा पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध ३१ मार्च रोजी विविध कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळा भत्या येथिल शेतकरी गणेश रावसाहेब मोरे वय ४२ वर्षे हे आपल्या कुटुंबासह राहतात.त्यांना त्यांच्या वडीलोपार्जित जमीतुन त्यांच्या हिस्स्याला जमीन मिळाली होती.ती जमीन कसुन ते आपली उपजीविका भागवत असतं पऱतु त्या़ची जमीन सुपीक व रस्त्याच्या कडेला असल्याने ती जमीन परत त्यांचा चुलतागोपाळराव भाऊराव मोरे यांना हवी होती.यासाठी त्यांनी या अगोदर आपला पुतण्या गणेश मोरे यासोबत वाद घातले होते.दरम्यान दि.३१ मार्च रोजी ते त्या़चा भाऊ व्यंकटी बरोबर आपल्या गट नं.१३२ मधील शेतात गेले असता त्यांना त्यांच्या जमीनीवर चुलता गोपाळराव व त्या़ची तीन मुले हे उभे राहून ट्रॅक्टरने मोगडा लाऊन शेत नांगरत असल्याचे दिसले.यावरुन गणेशने त्यांना विरोध केला.विरोद करतातच चार जणांनी मिळून गणेश व व्यंकटी यास शिवीगाळ करून मारहाण करत होते.दरम्यान त्यांनी हातातील काठ्यांनी गणेशला दात पडो पर्यंत मार मार मारले यात तो गंभीर जखमी झाला.यानंतर तो चुडावा पोलिसांत जाऊन चुलता व चुलत भावा विरोधात तक्रार दाखल केली या तक्रारीवरून गोपाळराव मोरे,प्रदिप मोरे,प्रसाद मोरे,दिपक मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास चुडावा पोलिस करत आहेत.घटनेतील मार देणारे चारही जणं पसार झाले आहेत.

You cannot copy content of this page