Purna Sucide Newsनैराश्य भावनेतून तरुणांची गळफास लावून आत्महत्या
आडगांव(ला) येथील घटना;पूर्णा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
पुर्णा ता.९(प्रतिनिधी)
एका अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या २४ वर्षीय तरुण सुशिक्षित मुलाने हाताला काही काम लागत नाही,नौकरी मिळत नाही, कुटुंबाचा गाडा कसा हकावा या नैराश्य भावनेतून रहात्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपल्याची दुर्दैवी घटना (Purana Sucide News)पूर्णा तालुक्यातील मौजे आडगांव (ला) येथे घडली आहे.याप्रकरणी(Police Station Purna)पूर्णा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. श्रृषिकेश पंडीतराव भालेराव (वय २४) वर्षे रा. आडगांव लासिना ता.पूर्णा. जि.परभणी असं त्या मयत तरुणाचे नाव आहे.मयत तरुण आपल्या आई वडील,भाऊ,भावजय,पुतण्यासह आडगांव येथे राहतो.घरची परिस्थिती जेमतेम ५० आर शेतजमीन असल्याने मोलमजुरी करून बी.सी.एसचे शिक्षण घेत होता.दरम्यान हाताला काम,नौकरी मिळत नसल्याने संसाराचा गाडा कसा हाकावा यासाठी तो मागील काही दिवसांपासून विवंचनेत होता.गुरुवारी (ता.९) रोजी ऋषीकेशचा पुतण्या आजारी असल्याने दुपारी संबंध कुटुंबीय पुर्णा येथे रुग्णालयात गेले होते.यावेळी घरात कोणी नसल्याने त्याने छताच्या हुकाला नायलॉन दोरी अडकून गळफास लावला.हि घटना ग्रामस्थांनी पाहीली असता सरपंचांनी कुटुंबीयां सह पुर्णा पोलीसांना याबाबत माहिती दिली.घटनास्थळी पो.नि. विलास गोबाडे,फौजदार आमेर चाऊस, पोकाॅ.दुतमल पो.पा.भालेराव आदींनी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला.मयताचे वडील पंडीतराव भालेराव यांनी पोलीसांत खबर दाखल केली.यावरुन घटने प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास फौजदार चाऊस हे करत आहेत.
शासनाने उपाययोजना करण्याची गरज. निर्सगाचा लहरीपणामुळे शेती बेभरवशाचा व्यवसाय झाला आहे,त्यातच वाढती महागाई,बेरोजगारी,यामुळे अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे.कर्जबाजारीपणा तसेच आर्थिक विवंचनेत अनेक शेतकऱ्यांपाठोपाठ बेरोजगार तरुण देखील मृत्युला कवटाळत आहेत.त्यामुळे शासनाने यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.












