जातीय तेढ निर्माण करुन दुसऱ्याला अडकविण्याचा बेबनाव करणा-यावर गुन्हा
पूर्णा पोलीसांत गुन्हा दाखल
पूर्णा(प्रतिनिधी)
तालुक्यातील आहेरवाडी येथील एका विक्षीप्त मनोवृत्तीच्या ईसमाने नाहक दुसऱ्याला अडकवण्यासाठी संविधानाचा वापर करुन संविधान पुस्तकाची प्रत फाडून स्वतःचे हात पाय बांधून स्वतःचे छायाचित्रे समाज माध्यमातून इतरांना पाठवून बेबनाव केल्याचा प्रकार केला . पोलीसांनी खाक्या दाखवताच सदरील प्रकार दुसऱ्याला अडकविण्यासाठीच बेबनाव केला असल्याचे कबूल केल्यानंतर पूर्णा पोलीसांनी सदरील सीमा विरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथील बबन खंदारे महाराज याने गावातील एका ईसमाशी झालेल्या जुन्या भांडणाच्या वादातून त्याला कोणत्यातरी प्रकरणात अडकविण्यासाठी मनोविकृत बेत आखला होता. यासाठी त्याने शुक्रवारी ७ रोजी दुपारच्या सुमारास आपल्या घरातच संविधान पत्रीकेचे वाचन करतानाचे फोटो काढले.तसेच हातपाय बांधून संविधानाची प्रत फाडली असल्याचा बेबनाव करुन . त्याची छायाचित्रे काढून ती समाज माध्यमाद्वारे इतर काही जणांना
पाठविली होती. त्यानंतर ही माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी डाॅ समाधान पाटील,पो.नि.विलास गोबाडे जमादार आमेर चाऊस,आदींसह पोलिस अधिकारी कर्मचारी आहेरवाडी येथे जाऊन सदरील प्रकार पाहीला दरम्यान याबाबत काहीजण पोलिस ठाण्यातही गेले होते.पोलीसांनी याप्रकरणी संबंधित असलेल्या सर्वांना ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या उलट तपासणीत तसेच फोटो मध्ये कपडे न घालवता व संविधान फाडले दरम्यान कपडे घातलेले असल्याचे फोटोत दिसत असलेल्या ईसमानेच या प्रकरणी गोंधळ घालून प्रशासनाची दिशाभूल करण्याचा तसेच बेबनाव करुन जातीय तेढ निर्माण करत असल्याचा हा सारा खटाटोप केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
का युवकावर पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी गावातील काही प्रतिष्ठितांना बोलवून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने बबन खंदारे याला तेथेच ताब्यात घेतले. या प्रकरणात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अमर चाऊस यांच्या फिर्यादीवरून बबन रामराव खंदारे महाराज याच्याविरुद्ध गुरनं ७४/२०२५ भा.न्या.सं १९६,२१७,२४८ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो.नि.विलास गोबाडे हे करत आहेत..