Purna ‘हर हर महादेव’ च्या गजरात पुर्णा-औंढा नागनाथ कावड यात्रा मार्गस्थ
पूर्णेतील हजारों शिवभक्तांचा सहभाग: शहरात भाविकांची मांदियाळी
पूर्णा ता.२ (Purna Kavad Yatra) : शहरातील जय महाकाल कावड मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पूर्णा- औंढा नागनाथ कावड यात्रा शनिवार २ ऑगस्ट रोजी दुपारी वाजत गाजत’हर हर महादेव’ ‘बस बस भोले’च्या गजरात भव्य कावड यात्रा (Kavad Yatra) मार्गस्थ झाली.पूर्णा येथील कुंभार गल्ली भागातील जागृत हनुमान, महादेव मंदिर देवस्थान येथून कावड यात्रेला प्रारंभ झाला.कावड यात्रा श्री गुरु बुद्धीस्वामी मठ संस्थान, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा बसवेश्वर चौक,आनंदनगर, छत्रपती राजे संभाजी महाराज चौक ,राजमुद्रा चौक झिरो फाटा रोडमार्गे निघालेल्या कावडयात्रेत तालुक्यातील शिवभक्त मोठ्यासंख्येने सहभागी झाले. दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी कावड यात्रेची पुजन केले.

त्यांनी सहभागी होऊन खांद्यावर कावड घेतली.यावेळी जय महाकाल कावड मंडळाच्या सेवेक-यांचा पुष्पहार देऊन सत्कारही केला.ही कावड यात्रा शनिवारी मध्यरात्री औंढा नागनाथ येथे पोहोचेल. श्रीनागनाथ प्रभुंचा जलाभिषेक करुन परतीच्या प्रवासात जवळाबाजार,बाराशिव हनुमान,हट्टा,झिरो फाटा, एरंडेश्वर मार्गाने पुर्णा येथे सोमवारी सकाळी परतणार आहे. कावड यात्रेतील सेवेक-यांसाठी जागोजागी चहापान, फराळ, भोजनाची व्यवस्था भाविकांनी केली आहे.

वर्ष ३ रे..!
जय महाकाल कावड मंडळाचा उपक्रम
मागील तीन वर्षांपासून सातत्याने जय महाकाल कावड मंडळ पूर्णा हा उपक्रम दरवर्षी श्रावण महिन्यात आयोजित करतो या उपक्रमात हजारोंच्या संख्येने शिव भक्त मोठ्या भक्तीभावाने सहभागी होतात.












