भाजपचा पुर्णेत सेवा पंधरवडा कार्यशाळा; पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

Spread the love

पूर्णा, दि.१३ (प्रतिनिधी) 
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत पूर्णा ग्रामीण मंडळामार्फत शनिवारी (दि.१३ सप्टेंबर) रोजी पुर्णा येथील श्रीराम मंदिर सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत भाजपचे जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
सेवा पंधरवडा प्रभारी तथा मार्गदर्शक मा. श्री. संतोष भाऊ मुरकुटे (जिल्हाध्यक्ष भाजपा, परभणी) प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूर्णा ग्रामीण मंडळाध्यक्ष संजय मोहिते यांनी कार्यभार सांभाळला.प्रमुख उपस्थितीत नंदकिशोर आपा बलोरे (जिल्हाध्यक्ष, भाजयुमो परभणी), सेवा पंधरवडा जिल्हा संयोजक ऋषिकेश सकनूर (जिल्हा महामंत्री, भाजपा परभणी), मार्केट कमिटी सभापती बालाजीराव खैरे, उपसभापती नारायणराव पिसाळ, माजी जि.प. सदस्य विश्वनाथ सोळंके, तसेच भाजपा चिटणीस नरहरी ढोणे आदी मान्यवरांचा समावेश होता.
यावेळी मंडळ सरचिटणीस रामभाऊ चापके, मंडळ उपाध्यक्ष उद्धवराव मोरे, कैलास वाघ, बालाजी रोडगे, ज्ञानेश्वर रोडगे, मनोहर चव्हाण, विजय सूर्यवंशी आदींनी कार्यशाळेचे संचालन व समन्वय साधला. मंडळ चिटणीस विजय सोनटक्के, राम काळे, जळबाजी बुचाले, सुधाकर काळे यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.याशिवाय ओबीसी मोर्चा मंडळाध्यक्ष केशव होळपादे, किसान मोर्चा मंडळाध्यक्ष बालाजी शेळके, अनुसूचित जाती मंडळाध्यक्ष प्रशांत गच्चे, महिला मोर्चा मंडळाध्यक्षा अरुणा गंजिले यांनी विभागीय भूमिका मांडल्या. तसेच संतोष कुरे, सुनील डुब्बेवार, राजेश धुत, गंगाधर मामा बुचाले, संतोष महाराज बनसोडे, रावजी हेंडगे, नंदेस घोनसीकर आदी पदाधिकाऱ्यांची सक्रिय उपस्थिती लक्षणीय होती.
कार्यशाळेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा आढावा घेऊन "सेवा हीच संघटना" या ध्येयवाक्याशी सुसंगत विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागात पक्षाचे जनसंपर्क दृढ करण्या साठी सेवा पंधरवडा प्रभावी ठरेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page