Purna Railwayचुडावा-मरसुळ बायपास नकोच.! पुर्णेकरांसह प्रकल्पास जमीनी देणा-या शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

Spread the love

सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी मागणी

पूर्णा ता.३१(प्रतिनिधी)
अकोला-पुर्णा-नांदेड मार्गावरील प्रस्तावित चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला पुर्णेकरांसह प्रकल्पास जमीनी देणा-या शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.गुरुवारी (ता.३१) रोजी पूर्णा पालीकेच्या सभागृहात पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बायपास नकोच अशी एकमुखी मागणी करण्यात आली.
पूर्णा शहरातील नगर परिषदेच्या सावित्रीबाई फुले सभागृहात रेल्वे विभागाच्या वतीने प्रस्तावित केलेल्या चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक संपन्न झाली.या बैठकीत पूर्णा तालुक्यातीलआडगांव,पुर्णा, पांगरा, गौर, मरसुळ,येथिल बाधीत शेतकऱ्यांसह माजी नगराध्यक्ष उत्तमरावजी कदम,प्रकाशदादा कांबळे, जिल्हाप्रमुख विशाल कदम, डॉ विनय वाघमारे, ओंकारसिंह ठाकूर,डॉ.हरिभाऊ पाटील,मा.नगराध्यक्ष संतोष एकलारे, जाकीर कुरेशी, सुधाकर खराटे,उत्तम भैय्या खंदारे, हबीब सर,रौफ कुरेशी,अब्दुल मुजीब,डॉ. जयप्रकाश मोदाणी, सुनिल डुब्बेवार,शिवहार सोनटक्के,साहेबराव कल्याणकर, सुनिल जाधव,अँड.हर्षवर्धन गायकवाड व,अँड राजेश भालेराव, अनिल खर्गखराटे, दादाराव पंडित,सुनील मगरे,मो.शफी, यांच्या सह शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी,आजी माजी लोकप्रतिनिधीं हजारोंच्या संख्येने पुर्णेकर बांधवांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी या बायपास मुळे शेतकरी भुमीहीन होणार आहेत,व्यापा-यांचे व्यवसाय अडचणीत येणार आहेत दळणवळणावर परिणाम, पुर्णा रेल्वे जंक्शनच्या विकासाला फटका,याच कारणांमुळे अकोला-पुर्णा-नांदेड मार्गावरील प्रस्तावित चुडावा-मरसुळ रेल्वे बायपासला विरोध होत आहे. सर्वपक्षीय जन बैठकीत रेल्वे विभागाच्या या भुमिके विरोधात जन आंदोलन छेडण्याचा ईशारा देत न्यायीक लढाई उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.यावेळी उपस्थितीतांनी आपले मनोगत व्यक्त केले.बैठकीचे सुत्रसंचलन अँड सदई,तर आभार प्रदिप नववरे यांनी केले.

You cannot copy content of this page