Purna Chudawa Crime शिरच्छेद करणारा ईसम गजाआड
पूर्णेतील धनगर टाकळी फाट्यावरील निर्घृण खूनाची घटना;स्था.गु.शा. व चुडावा पोलीसांनी ४८ तासात घेतलं मारेकऱ्यांस ताब्यात; चार दिवसांची पोलीस कोठडी
पूर्णा ता.१५(प्रतिनिधी)मागील तीन दिवसांपूर्वी शहराजवळील (Parbhani Purna Chudawa Murder Case)चुडावा हद्दीत धनगर टाकळी फाटा येथे उघडकीस आलेल्या २५ वर्षीय तरुणाच्या निर्घृण खून प्रकरणाची उकल करण्यास पोलिसांना यश आले असून अवघ्या ४८ तासात (Chudawa Police Station)चुडावा पोलीस व स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी या घटनेचा छडा लावला आहे.याप्रकरणी एकास गजाआड करुन जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पूर्णा शहरापासून काही अंतरावर चुडावा पोलीसांच्या हद्दीतील धनगर टाकळी फाटा जवळ पालम तालुक्यातील वाणी पिंपळगाव येथील मयत नामें रोहिदास विक्रम शेवाळे (वय २५) याचा अत्यंत क्रुर पद्धतीने शिरच्छेद करत निर्घृण खुन केल्याची घटना उघडकीस आली होती.याप्रकरणी चुडवा पोलिसांत मयताच्या आईने (ता.१२) रोजी मंगळवारी अज्ञाता विरोधात कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल केला होता. रोहीदास शेवाळेचा खुन कोणी व कशामुळे केला.याचा तपास लावणे पोलिसांसमोर मोठे आवहान बनले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनेचं गांभीर्य ओळखून चूडावा पोलिसांसह स्थानिक गुन्हा शाखेचे पथक पाठवले होते. पोलिसांच्या या संयुक्त टीमने घटनेचा सखोलपणे तपास करुन या खून प्रकरणाशी संबंधित असलेला ईसम नामे शेख रमजान शेख मदार (वय ३९) रा.वाणी पिंपळगाव ता.पालम यास त्याच्या गावातुन ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारपूस केली. संबंधित इसमाने प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली.परंतु पोलीसांनी खाक्या दाखवताच त्याने सदरील खून केल्याचे पोलिसांसमोर कबूल केलं, हा खून त्याने पैशाच्या वादातून केल्याचे सांगितले.पोलिसांनी त्यास गजाआड करत शुक्रवारी (ता.१५) रोजी दुपारी मा. जिल्हा न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास सोमवार (ता.१८) रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सुशांत किनगे हे करत आहेत.
यांनी केली गुन्ह्यांची उकल…
चुडावा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहीदास शेवाळे खुन प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी यांचे मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांचे नेतृत्वात उप.वि.पो.अ.समाधान पाटील (पुर्णा), पो.नि.विलास गोबाडे(पुर्णा), चुडावा ठाणेदार सुशांत किनगे,स.पो.नी पी.डी. भारती, राजु मुत्येपोड,जगताप, फौजदार चंदनसिंह परिहार,पोलीस अंमलदार मधूकर चट्टे,सुग्रीव केंद्रे,निलेश भुजबळ, रघुनाथ दुधाटें, सचिन भदरगे, गजानन क्षीरसागर, कागणे,राहूल परसोडे, गायकवाड, शरद सावंत, निलपत्रेवार सर्व नेमणूक स्था.गुशा व चुडावा पोलीस ठाण्याचे जमादार कच्छवे, राजेश ऐटवार, मिटके, पोहेकाॅ.जाधव व पोहेकाॅ. हानवते सायबर सेलचे गणेश कौटकर, बालाजी रेड्डी यांनी ही कामगिरी बजावली आहे.
काय आहे हत्येचे नेमके कारण….
मयत रोहीदास शेळके व शेख रमजान शेख मदार हे दोघे मित्र एकाच गावचे रहिवासी दरम्यान काही महिन्यांपूर्वी शेख रमजान याने मुलीच्या लग्नासाठी रोहीदास यांचे कडून रोहीदासच्या नावाने एका फायनान्स कंपनी कडून ५ लाखांचे कर्ज उचलले होते.कर्जाच्या ४ हप्त्याची परतफेड देखील त्याने केली होती.दरम्यान काही दिवसांपासून कर्जाचे हप्ते थकल्यानंतर दोघांत यावरुन वाद होत होते.यानंतर रोहीदासचा काटा काढला तर कर्ज फेडण्याची कटकट दुर होईल या विचाराने त्याने रोहीदासच्या हत्येचा बेत आखला.रविवारी (ता.१०) रोजी रमजाने त्याला पुर्णा येथे आणुन दुपारी धनगर टाकळी फाटा येथे एका पडीत निर्मनुष्य ठिकाणी दारु पाजली. रोहीदास दारुच्या नशेत तर्र असताना रमजान याने सोबत असलेल्या (सतुर) तिक्ष हत्याराने त्यांच्या मानेवर घाव घालून त्याचे शिर धडावेगळे करून तो घटनास्थळावरून पसार झाला. दोन दिवसानंतर परिसरात गुरे चारणा-यां गुराख्याने रोहीदासचा मृतदेह पाहील्या नंतर सदरील प्रकरण उघडकीस आले.












