Purna Congress News अतीवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी;काँग्रेसचे निवेदन

Spread the love

पूर्णा ता.१८(प्रतिनिधी)जिल्ह्यात मागील चार पावसाची संततधार सुरू आहे.पूर्णा तालुक्याला अतीवृष्टीने झोडपून काढले आहेत.तालुक्यातील हजारों हेक्टरवरील उभी पिके जमीनदोस्त होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी.अश्या मागणीचे निवेदन पूर्णेतील काँग्रेस पक्षाच्या वतीने पुर्णा तहसीलदारांना दिले आहे.

पुर्णा तालुक्यात अतीवृष्टीने खरिप हंगाम धोक्यात आला आहे.हजारो हेक्टर शेतजमीनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. ओढावलेल्या या नैसर्गिक आपत्ती मुळे शेतकरी वर्ग आर्थिकदृष्ट्या उध्वस्त होण्याच्या मार्गावर असून, शासनाने तालुक्यातील सर्व गावांमध्ये तात्काळ व सकृतदर्शनी पंचनामे करण्यात यावेत. पंचनाम्यानुसार शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी नुकसानभरपाई त्वरीत देऊन ती थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी.शेतकऱ्यांच्या स्थितीचा विचार करून विशेष आर्थिक मदत पॅकेज घोषित करण्यात यावे. पंचनाम्याची व नुकसान भरपाईची प्रक्रिया पारदर्शक व वेगाने राबवावी.अशी मागणी पूर्णा तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनावर प्रल्हाद पारवे (तालुकाध्यक्ष), निखिल धामणगावे (जिल्हाध्यक्ष, काँग्रेस सोशल मीडिया), पांडुरंग कदम (शहर उपाध्यक्ष), सदाशिव वाटोडे (मागासवर्गीय तालुका अध्यक्ष),शेख रफिक (अल्पसंख्यांक काँग्रेस तालुकाध्यक्ष), विठ्ठल कापुरे (काँग्रेस नेते), किशोर नागठाणे (काँग्रेस नेते) आदींच्या सह्या आहेत.

You cannot copy content of this page