आत्याच्याच मुलाने केला मामाच्या अल्पवयीन मुलीचा शारीरिक व मानसिक छळ

Spread the love

समाजमाध्यमावर फोटो व्हायला करण्याची दिली धमकी;पूर्णा पोलिस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

पूर्णा(प्रतिनिधी)

तालूक्यातील खुजडा येथील एका १७ वर्षिय अल्पवयीन मुलीचे नात्याचा फायदा घेऊन आत्याच्याच मुलाने जवळीक साधत सोबत काढलेले फोटो समाज माध्यमावर व्हायरल करण्याची धमकी देऊन शारीरिक व मानसिक त्रास देत छळ करीत विनयभंग केल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी पूर्णा पोलिस ठाण्यात ९ फेब्रुवारी शनिवार रोजी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, पूर्णा तालूक्यातील खुजडा येथील रहिवासी असलेली एक १७ वर्षिय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह गावी राहते.तिची आत्या बरबडी येथील रहिवासी असून ती सध्या पुणे येथे राहते.तिला एक २१ वर्षाचा मुलगा असून सदरील तरुण हा मामाच्या गावी येत असल्याने त्यांच्यात असलेल्या नात्याची जवळीक साधून तो तीला अधूनमधून फोनवर बोलत होता.दरम्यान,दहावीची परीक्षा झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी तिच्या वडिलांनी नांदेड येथील एका गर्ल्स हॉस्टेलवर ठेवले होते.तेथे राहत असताना सदरील तरुण हा पिडीत तरुणीला तिच्या मैत्रिणीच्या मोबाईलवर बोलत असे एक वेळ तो नांदेड येथे भेटण्यासाठी आला होता त्याने तिला एका कॉफी शॉप मध्य बोलवून जवळ ओढून बळजबरीने स्त्रीमनाला लाजवेल असे फोटो त्याच्या मोबाईल मध्य काढले.यानंतर तिने त्या मुलाशी बोलणे टाळले घडलेल्या प्रकारामुळे सदर पिडीत मुलीचे मानसिक व शारीरिक स्थैर्य हरवले.सदर घटना मुलीने तिच्या वडिलांना देखील कळवली.त्यावरुन वडिलांनी सदर मुलास समजावून सांगितले असता या बाबत त्याने पिडीता व तिच्या कुटुंबीयांना त्या मुलाने पिडीता जर मला बोलली नाही तर मी माझ्या जिवाचे काही बरेवाईट करुन घेईल व पिडीते सोबतचे काढलेले फोटो समाज माध्यमावर व्हायरल करील,असी धमकी देत मानसिक व शारीरिक छळ केला.म्हणून सदर पिडीत मुलीने आत्याच्या मुला विरुद्ध पूर्णा पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोक्सो कायद्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास फौजदार प्रकाश ईंगोले हे करीत आहेत.

You cannot copy content of this page