पुर्णा दहीहंडी महोत्सव; गंगाखेडचे राजे संभाजी गोविंदा पथक प्रथम
शिवसेनेच्या दहीहंडी महोत्सवाची सांगता;जय नृसिंह गंगाखेड द्वितीय,जय बजरंग लोहा तृतीय
पूर्णा, ता. १८(प्रतिनिधी )येथिल शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी महोत्सवातील दहीहंडी गंगाखेडच्या राजे संभाजी गोविंदा पथकाने फोडून प्रथम क्रमांक पटकावला आहे.नागरिकांनच्या अलोट गर्दीत पार पडलेल्या या महोत्सवात सुमारे दीड लाख रुपयांची पारितोषिके गोविंदा पथकांनी पटकावली आहेत.

पूर्णा शहरातील जूना मोंढा मैदानावर रविवारी (ता.१८) रोजी शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्या नेतृत्वाखाली गणेश कदम,सचिन कदम, यांनी भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन केले होते.यावेळी माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम व माजी नगराध्यक्ष सत्यनारायण कुल्थे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते दहीहंडी फोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर ऑपरेशन सिंदूर मधे सहभागी सैनिक मुंजाजी सुंदरराव कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, गणेशराव अंभोरे, एन. डी. देशमुख, क्षितिज चौधरी, पृथ्वीराज चौधरी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आयोजक विशाल कदम, गणेश कदम, सचिन उर्फ पप्पू कदम, एकनाथ लोखंडे, प्रकाश कराळे, नारायणराव पिसाळ,प्रशांत कापसे,शेख लतीफ ताज,रौफ कुरेशी,अमजद नुरी,ॲड.विशाल किरडे, सुनील इंगोले, गणेश कदम,प्रक्षित सवनेकर,लक्ष्मण कदम, भगवान सोळंके,माऊली कदम, अंकित कदम, गोविंद पळसकर,गोपाळराव कदम सावकार उपस्थित होते. यावेळी बोलताना मेघना बोर्डीकरांनी पुर्णा शहर वासीयांसह, गोविंदा पथकास शुभेच्छा दिल्या. सदरील दहीहंडी उत्सवात मराठवाड्यातील नामवंत दहीहंडी पथक सहभागी झाले होते.

या स्पर्धेत प्रथम पारितोषीक ५५००० रुपये व सन्मान चिन्ह गंगाखेड येथील राजे संभाजी गोविंदा पथकाने पटकावले , व्दितीय पारितोषीक ३१००० रुपये व सन्मानचिन्ह गंगाखेड येथील जय नृसिंह गोविंदा पथक , तृतीय पारितोषीक २१००० रुपये व सन्मान चिन्ह लोहा येथील जय बजरंग गोविंदा पथक यांनी पटकावले. यावेळी पंच म्हणून, माणिक कदम, संभाजी शेवटे, बालाजी वाघ, कैलास टेहरे, योगेश जोशी, प्रकाश रौंदळे, सज्जन जयस्वाल, धरमसिंह बायस, सतीश बरकुंटे यांनी काम पाहिले. पारितोषिक वितरण समारंभास पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, शिवराम भंगे, भगवान सोळंके, रवि गायकवाड, विजय यादव सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे, गजानन पाटील यांची उपस्थिती होती. मुंबई येथील प्रतिक्षा डान्स ग्रुपने कार्यक्रमाची रंगत वाढवली. सुत्रसंचालन जगदीश जोगदंड यांनी केले. दिनेश पवार यांनी आभार मानले.स्पर्धा यशस्वीतेसाठी दत्ता कदम,शरद कदम, कैलास मुळे,अक्षय कहाते,राम भालेराव, बंटी खाकरे,रवि गायकवाड,सह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.













