धनगर टाकळी;वेदशाळेत केंद्रीय वैदिक शिक्षा बोर्डाच्या पूरक परीक्षा संपन्न.
पूर्णा ता.१३(प्रतिनिधी)
तालुक्यातील मौजे धनगर टाकळी श्री सद्गुरु वेंकटेश दाजी महाराज प्रेरित सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान. , येथे शिक्षा मंत्रालय भारत सरकारच्या अंतर्गत महर्षि सांदीपनी राष्ट्रीय वेद संस्कृत शिक्षा बोर्ड (MSRVSSB) च्या वतीने दिनांक 11,12 व 13 जून 2025 या दरम्यान वेदाच्या मौखिक तसेच गणित, इंग्लिश, विज्ञान, सामाजिक विज्ञान, संस्कृत या विषयांच्या लेखी पूरक (supplementary) परीक्षा संपन्न झाल्या. या परीक्षेत राज्यभरातून 75 विद्यार्थी व संबंधित अध्यापक सहभागी झाले. प्रतिवर्षी होणाऱ्या वार्षिक परीक्षांसाठी धनगर टाकळीचे सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान हे 2008 पासून नियमित परीक्षा केंद्र म्हणून मान्यता प्राप्त आहे. परंतु यावेळी विशेष अभिमानाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात पूरक (supplementary) परीक्षांसाठी केवळ टाकळीचे सच्चिदानंद वेद स्वाध्याय प्रतिष्ठान. व नागपूर अशी दोनच केंद्रे नेमण्यात आलेली होती. या परिक्षेकरीता संस्थापक वेदमूर्ती श्री. उमेश महाराज टाकळीकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच मुख्याध्यापक वेदमूर्तीश्री.अवधूतमहाराज टाकळीकर यांनी केंद्राध्यक्ष म्हणून तसेच मराठवाडा हायस्कूल चे निवृत्त प्राचार्य श्री.भानुदास जोशी सर यांनी केंद्र पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. डॉ.श्री.जयदीप कोपरेकर, सौ.सोनल कोपरेकर आदींनी कक्ष पर्यवेक्षक म्हणून कार्यभार सांभाळला. तसेच वेदपाठशाळेतील अजय कागबट्टे , वेदांत जोशी, सार्थक पांडे यांसह सर्व विद्यार्थी वृंदांनी कष्ट घेतले.