Purna Murder Newsमस्तक धडापासून वेगळं असलेला मृतदेह आढळला

Spread the love

पूर्णेतील धनगर(टा) फाट्यावरील घटना; परिसरात खळबळ;चुडावा पोलीस घटनास्थळी दाखल

पूर्णा ता.१२(प्रतिनिधी)कोणीतरी अज्ञात व्यक्तीने एका २५ वर्षीय तरुणाचा निर्घृण पद्धतीने खून करुन धडापासून मस्तक वेगळे करुन मृतदेह रस्त्याच्या कडेला वाढलेल्या तणात फेकून दिल्याची घटना(purna dhangar takli phata murder news)पूर्णा शहरा नजीक असलेल्या धनगर फाट्याजवळ घडल्याचे उघडकीस आले आहे.घटनेने एकच खळबळ उडाली असून,घटनास्थळी चुडावा पोलिसांचे पथक दाखल झाले असून पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी तसे तज्ञ श्वानपतकाला प्राचार्य केले असल्याचे समजते.
याबाबत अधिक माहिती अशी की, चुडावा पोलिसांच्या हद्दीतील पूर्णा नांदेड रस्त्या वर असलेल्या धनगर टाकळी फाट्या जवळ मंगळवारी ता.१२ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास एका पंचवीस वर्षीय तरुणाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला वाढलेल्या त्यांना मध्ये धडा वेगळे मस्त केलेल्या अवस्थेत काही गुराख्यांना आढळून आला. घटनेची माहिती गुराख्यांनी चुडवा पोलिसांना दिली. घटनास्थळी सपोनी. किनगे, फौजदार मुखेडकर, जमादार राठोड, पोहेकाॅ. हानवते,पोहेका.ससाणे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन शीर धडा वेगळे असलेला मृतदेह ताब्यात घेत, घटनास्थळी पंचनामा केला. यावेळी पोलिसांना सदरील युवक हा पालम तालुक्यातील महादेव पिंपळगाव येथील रोहीदास विक्रम शेवाळे (वय २५) वर्षं असल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या दुनियाशी संपर्क साधून मृतदेहाची शहानिशा करून ओळख पटवली आहे.
पोलिसांनी घटनेची गांभीर लक्षात घेऊन परभणी पोलीस दलातील ठसे तज्ञ तसेच श्वान पथकाला घटनास्थळी प्रचार केले आहे. सदरील तरुणाचा खून नेमका कोणत्या कारणास्तव झाला कोणी केला. या दिशेने पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला असून आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना केली असल्याचे सपोनि किनगे यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page