आ.डॉ.गुट्टे काका मित्र मंडळाच्या वतीने पुर्णेत रक्तदान,फळ व साडीवाटप कार्यक्रमांचे आयोजन
आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांचा अभिष्टचिंतन सोहळा
पुर्णा ता.१२(प्रतिनिधी)
गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या अभिष्टचिंतन सोहळानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका प्रभारी नितीन उर्फ बंटी कदम शहराध्यक्ष अँड राजेश भालेराव यांनी दिली आहे.

पूर्णा तालुक्यातील आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते दरवर्षी मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.यंदा तालुका अध्यक्ष सुभाषराव देसाई,तालुका प्रभारी नितीन उर्फ बंटी कदम,शहराध्यक्ष अँड.राजेश भालेराव यांच्या नेतृत्वाखाली ता.१२ ऑगस्ट रोजी स.९ वा.पुर्णा येथे डॉ.गुट्टे मित्र मंडळाच्या कार्यालय परिसरात तसेच कावलगांव येथेही रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे.यानंतर १० वा. ग्रामीण रुग्णालयात फळवाटप, पांगरा ढोणे येथे फराळ वाटप, सायं ४ वा. कोळीवाडा परिसरात साडी वाटप, दरम्यान दु.१ वा.मुकबधीर शाळेत विद्यार्थ्यां सोबत महाभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती रहावे असे आवाहन आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्र मंडळाच्या वतीने तालुका अध्यक्ष सुभाषराव देसाई,तालुका प्रभारी नितीन उर्फ बंटी कदम, शहराध्यक्ष अँड राजेश भालेराव यांनी केले आहे












