Purnaशहीद भगतसिंगांच्या स्मारकासाठी उपोषण करणा-या त्या तरुणाच्या उपोषणाची सांगता
ना.त.प्रशांत थारकर,सपोनी.किनगे यांची यशस्वी मध्यस्थी;अखेर ७ व्या दिवशी गोविंद कदमचे उपोषण मागे
पूर्णा ता.६ (प्रतिनिधी):क्रांतिकारक शहीद भगतसिंग (Shaeed Bhagatsing)यांचे नवपिढीला प्रेरणादेणारे भव्य स्वरुपाचे स्मारक महाराष्ट्रात कुठेही नाही.त्यांचे स्मारक परभणी(Parbhani Purna)जिल्ह्यात व्हावे याकरिता,थोर देशभक्तावर प्रेम करणा-या पूर्णा तालूक्यातील सोन्ना येथील गोविंद कदम या युवकाने मागील सात दिवसांपासून सुरू केलेल्या अन्न जल त्याग प्राणांतिक उपोषणाची सांगता करण्यास गावकरी व महसूल नायब तहसीलदार प्रशांत थारकर सपोनि सुशांत किनगे यांना अखेर ता.६ आगस्ट रोजी सातव्या दिवशी यश आले आहे.
शहिद भगतसिंग यांच्या विचारांचा प्रभाव असलेल्या गोविंद ग्यानोजी कदम रा.सोन्ना या.पुर्णा यांनी (ता.३१) जुलै पासून गावातील ग्रामपंचायत समोर अन्न,जलत्याग करून प्राणांतीक उपोषणाला सुरुवात केली होती. दरम्यान, यापूर्वी त्यांनी परभणी जिल्ह्यात कुठेही थोर देशभक्ताचे स्मारक व्हावे यासाठी पाठपुरावा केला होता.ग्रामपंचायत पासून मंत्रालयापर्यंत आपल्या मागणीचा रेटा लावून धरला होता.प्रशासनाने या बाबत कोणतीही भूमिका घेतली नाही.त्यामुळे गोविंद कदम यांनी आपल्या गावातच उपोषण चालू केले होते.यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले.त्यांच्या प्रलंबित मागणी अर्जावर हालचाल चालू केली व उपोषण मागे घेण्या संदर्भात विनंती केली होती.दरम्यान, परिसरातील राजकीय पुढारी, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, प्रशासनातील अधिकारी यांनी उपोषणाला भेट दिली होती.शेवटी सातव्या दिवशी ग्रामस्थ व महसूलचे अधिकारी थारकर, सपोनि किनगे यांनी बुधवारी यशस्वी मध्यस्थी करत प्रशासनाला महापुरुषाचे स्मारक करण्यासाठी स्थानिक प्रशासना कडून मंत्रालयात जागा व ईतर बाबी संदर्भात पाठपुरावा सुरु केलेला आहे. त्यासाठी लागणारा वेळ देवून सहकार्य करावे,असे अश्वासीत केल्यानंतर गोविंद या युवकाने उपोषण मागे घेतले.यावेळी बळीराम कदम, बालाजी कदम सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












