पूर्णेत’एकात्म अभियानांतर्गत’आरोग्य कर्मचा-यांचे प्रशिक्षण

Spread the love

आरोग्य विभाग व हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट यांचा सयुक्त उपक्रम

पूर्णा(प्रतिनिधी)

भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने श्री रामचंद्रा मिशन हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट यांच्या सहकार्याने सहज मार्ग या संकल्पने अंतर्गत ‘एकात्म अभियान’ आयोजित केले असून ग्रामीण भागातील तळागाळातील ग्रामस्थांचे मानसिक आरोग्य सक्षम बनवणे हा या अभियानाच प्रमुख उद्देश असून आज पुर्णा तालुक्यातील प्रा.आ.केंद्र कावलगाव, कंठेश्वर व एरंडेश्वर येथे आरोग्य विभागातील वैद्यकिय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका यांचे ‘एकात्म अभियान’ प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले.

हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटच्या विभागीय समन्वयक डॉ.अंजली निरस यांनी सविस्तर मार्गदर्शन करुन प्रशिक्षक प्रा.डॉ. स्नेहा करमरकर, नम्रता पत्तेवार, अभ्यासक बबन पानपट्टे, रामेश्वर जामकर व मधुकर हालगे यांनी उपस्थितांना प्रशिक्षण दिले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. व्हि.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकिय अधिकारी सुरेश गिणगीने, डॉ.स्वप्निल देसाई, डॉ. नामदेव डाखुरे, डॉ.रवि कपाटे यांनी आरोग्य विभागातील अधिाकरी व कर्मचारी यांचे ऱ्हदय, फुफुस पुनर्जिवन (CPR) प्रशिक्षण घेऊन प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
‘एकात्म अभियान’ या संकल्पनेच्या माध्यमातून ग्रामीण जनतेच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊन व्यसनमुक्त व तणावरहित समाज निर्माण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा यावेळी बोलतांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. व्हि.आर. पाटील यांनी व्यक्त केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार डॉ.सुरेश गिणगीने यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page