Purna Independence Day;तहसीलदार कार्यालय, नगरपरिषद,पोलीस ठाण्यासह ठिक ठिकाणी ध्वजारोहण..
पूर्णा ता.१५(प्रतिनिधी)
भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वांतत्र्य दिन पुर्णा शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील तहसील कार्यालयात तहसीलदार माधवराव बोथिकर, नगरपरिषदेत मुख्याधिकारी उत्कर्ष गुठ्ठे, पोलीस ठाण्यात पो.नि.विलास गोबाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.यावेळी प्रशासकीय ईमारतीत आकर्षक विद्युत रोषणाई तसेच सजावट रंगबेरंगी पताके यांनी लक्ष वेधले होते.
पूर्णा शहरात सर्वात प्रथम पुर्णा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. पोलीसांचे परेड,राष्ट्रगीत उत्साहात पार पडले.यावेळी पोलीस ठाण्यात स.पो.नि सोमेश्वर शिंदे,सपोनि. शहारे, सपोनि गजानन पाटील, फौजदार प्रकाश इंगोले,सह पोलीस उपनिरीक्षक सहायक पोलीस उपनिरीक्षक, जमादार पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

नगरपरिषद पुर्णा येथे उत्कर्ष गुठ्ठे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.यावेळी नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी पावसाच्या सरी कोसळत असताना शहरात तिरंगा रॅली काढली.प्रसंगी कार्यालयीन अधीक्षक मुमतेजीत, लेखापाल रामराव पवार, यांच्या सह सर्व विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.

पूर्णा तहसील कार्यालयात सकाळी ९ वाजेच्या सुमारास पोलीसांनी परेड केली. यानंतर तहसीलदार माधवराव बोथिकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.यावेळी सामुहिक राष्ट्रगान पार पडले. प्रसंगी शहरातील पत्रकार, डॉक्टर , वकील,आजी माजी लोकप्रतिनिधीं सामाजिक कार्यकर्ते, यांच्या सह नायब तहसीलदार प्रशांत थारकर, ना.त.सतिश नाईक, ना.त.शिंदे सह महसूल कर्मचाऱ्यांनी उपस्थीतांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
